Home /News /national /

'तुम्ही महिला असाल तर तिथे विशेष काळजी घ्या, कारण...'; अमेरिकेनं भारतात येणाऱ्या नागरिकांना दिला सल्ला

'तुम्ही महिला असाल तर तिथे विशेष काळजी घ्या, कारण...'; अमेरिकेनं भारतात येणाऱ्या नागरिकांना दिला सल्ला

तुम्ही महिला असाल तर भारतात विशेष काळजी घ्या. एकट्याने प्रवास करू नका, कोणतीही पूर्वसूचना न देता दहशतवादी भारतात कधीही हल्ला करू शकतात, असंही यात सांगण्यात आलं आहे.

    नवी दिल्ली 01 एप्रिल : अमेरिकेने भारतात प्रवास करणाऱ्या अमेरिकन नागरिकांसाठी अ‍ॅडव्हायजरी (Advisory of America) जारी केली आहे. त्यात म्हटलं आहे की, गुन्हेगारी आणि दहशतवादामुळे भारतात अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. भारत आणि पाकिस्तान सीमेजवळील भाग धोकादायक असल्याने तिथे जाऊ नका, असा इशारा अ‍ॅडव्हायजरीमध्ये देण्यात आला आहे. पूर्व लडाख आणि त्याची राजधानी लेह वगळता केंद्रशासित प्रदेशात जाणं टाळा. तुम्ही महिला असाल तर भारतात विशेष काळजी घ्या. एकट्याने प्रवास करू नका, कोणतीही पूर्वसूचना न देता दहशतवादी भारतात कधीही हल्ला करू शकतात, असंही यात सांगण्यात आलं आहे. आसाम उर्वरित भारताच्या पुढे जाणार! स्वतंत्र टाइम झोनची मागणी, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण भारत आणि पाकिस्तान सीमेच्या 10 किमीच्या परिघात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या भागात अजिबात जाऊ नका, असं यात सांगण्यात आलं आहे. भारताच्या मोठ्या भागात अतिरेकी गट आणि नक्षलवादी सक्रिय आहेत. यामध्ये पूर्व महाराष्ट्र आणि उत्तर तेलंगणापासून पश्चिम बंगालपर्यंत, विशेषत: छत्तीसगड आणि झारखंडच्या ग्रामीण भागात आणि तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचा धोका असू शकतो. या नक्षलवाद्यांनी स्थानिक पोलीस, निमलष्करी दल आणि सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले केले आहेत. यूएस नागरिकांनी अशा धोकादायक ठिकाणी प्रवास करण्यापूर्वी यूएस दूतावासाकडून विशेष परवानगी घेणं आवश्यक आहे, असंही सांगण्यात आलं आहे. अमेरिकन अ‍ॅडव्हायजरीमध्ये म्हटलं आहे की, कोणत्याही आंतरराष्ट्रीय सहलीचे नियोजन करताना सर्वप्रथम संबंधित देशाबद्दल आणि त्या देशातील कोरोनाची स्थिती जाणून घ्या. तसंच तिथे लसीकरणाबाबतची स्थिती आणि रोग नियंत्रणाबाबत जारी केलेल्या शिफारसी समजून घ्या. तुम्हाला जर भारतात प्रवास करायचा असेल, तर दूतावासाच्या कोरोना पेजला भेट द्या आणि त्यासंबंधित इतर महत्त्वाची माहितीही जाणून घ्या. प्रवासात बदली झालेलं सामान परत मिळवण्यासाठी भलताच जुगाड; पठ्ठ्याने IndiGo ची वेबसाईटच केली हॅक अन्... अ‍ॅडव्हायजरीमध्ये अमेरिकन नागरिकांना सांगण्यात आलं आहे की, त्यांना भारतात त्यांच्या सुरक्षेसाठी सतर्क राहावं लागेल आणि भारतातील पर्यटन स्थळे आणि इतर ठिकाणी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागेल. भारतीय अधिकार्‍यांच्या अहवालाचा हवाला देत असं सांगण्यात आलं आहे की, बलात्कार हा भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या गुन्ह्यांपैकी एक आहे. येथील पर्यटनस्थळांवर लैंगिक छळासारखे हिंसक गुन्हे दाखल झाले आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: American indians, India america

    पुढील बातम्या