Home /News /videsh /

Joe Biden यांची जीभ घसरली, पत्रकाराचा प्रश्न ऐकून पुटपुटली शिवी; WHITE HOUSE ने केला कहर

Joe Biden यांची जीभ घसरली, पत्रकाराचा प्रश्न ऐकून पुटपुटली शिवी; WHITE HOUSE ने केला कहर

अडचणीचा प्रश्न विचारल्यामुळे संतापलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पत्रकाराला शिवी घातली. हे कमी म्हणून की काय ‘व्हाईट हाऊस’नं त्यावरही कळस चढवला.

    वॉशिंग्टन, 25 जानेवारी: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (US President) जो बायडेन (Joe Biden) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत (Press Conference) एका पत्रकाराने (Journalist) विचारलेल्या प्रश्नावर बायडेन यांची जीभ (insult) घसरल्याचं दिसून आलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे नियमितपणे पत्रकार परिषदा घेत असतात. व्हाईट हाऊसमध्ये रिपोर्टिंग करणारे वेगवेगळ्या वृत्तसमूहाचे पत्रकार या परिषदांना आवर्जून हजर राहतात आणि राष्ट्राध्यक्षांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारत असतात. अनेकदा अनेक प्रश्नांची उत्तरे राष्ट्राध्यक्षांकडे नसतात किंवा अनेक प्रश्नांची उत्तरं देणं हे गैरसोयीचं असतं. त्यामुळेच अशा प्रश्नांना शांतपणे उत्तर देऊन वेळ मारून देण्याचं धोरणच अनेकदा राष्ट्राध्यक्ष अवलंबत असल्याचं दिसतं. मात्र नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या मनातले शब्द ओठावर आल्याचं दिसलं. पत्रकाराला दिली शिवी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी ‘फॉक्स न्यूज’ या वृ्तसंस्थेचे पत्रकार पीटर डूसी यांनी राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेतील महागाईबाबत प्रश्न विचारला. महागाई ही आपली राजकीय लाएबिलिटी आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला. यावर भडकलेल्या राष्ट्राध्यक्षांनी शांत राहण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या तोंडून ‘What a stupid son of …’ असे शब्द निघाले. हे शब्द त्यांच्यासमोर ठेवलेल्या माईकमध्ये पकडले गेले आणि कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले.स्वतःशी बोलल्याप्रमाणेच हे शब्द त्यांनी उच्चारले होते, मात्र हा आवाजही माईकमधून रेकॉर्ड झाला आणि अमेरिकेच्या माध्यम वर्तुळात एकच खळबळ उडाली. बायडेन यांच्याकडून दिलगिरी पत्रकार पीटर डूसी यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना घडल्यानंतर एका तासात आपल्याला व्हाईट हाऊसमधून फोन आला आणि स्वतः राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिलगिरी व्यक्त केली, अशी माहिती दिली. आपण इतरांपेक्षा नेहमीच महत्त्वाचे आणि वेगळे प्रश्न विचारत राहणार, असं आपण त्यांना म्हटलं. वास्तविक, बायडेन यांनी जास्तीत जास्त माध्यमांसमोर येऊन बोलणं गरजेचं आहे. त्यासाठी ते एक-दोन अपशब्द वापरणार असतील, तरी हरकत नाही, अशी प्रतिक्रिया पत्रकार डूसी यांनी दिली आहे. हे वाचा-Night Club मधील गोंधळात 19 ठार; अगोदर चाकू हल्ला, मग भडकली आग व्हाईट हाऊसने केला कळस या सगळ्या प्रकरणात खरा कळस केला तो व्हाईट हाऊसने. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचं विधान आणि त्यात त्यांनी दिलेली शिवी या गोष्टी त्यांनी जाहीर केलेल्या प्रेसनोटमध्येही जशाच्या तशाच ठेवल्या. त्यामुळे सोमवारच्या पत्रकार परिषदेच्या औपचारिक प्रेसनोटमध्येही या शिव्या छापल्या गेल्या. यापूर्वीदेखील गेल्या आठवड्यात एका महिला पत्रकाराच्या प्रश्नावर राष्ट्राध्यक्षांनी अपशब्द वापरले होते.
    Published by:desk news
    First published:

    Tags: America, Joe biden, Journalist

    पुढील बातम्या