Home /News /national /

पुण्याचा आणखी एक विक्रम, NIVने तयार केली पहिली स्वदेशी Antibody टेस्ट किट

पुण्याचा आणखी एक विक्रम, NIVने तयार केली पहिली स्वदेशी Antibody टेस्ट किट

एका महिन्याच्या आता NIVने ही किट विकसित केली आहे. अतिशय कमी खर्चात आणि जलद गतीने आता अशा प्रकारच्या टेस्ट करता येणार आहेत.

    नवी दिल्ली 11 मे: कोरोनाविरुद्धच्या लढाईत पुण्याने आणखी एक मोठं काम केलं आहे. पुण्यातल्या National Institute of Virologyने पहिली स्वदेशी Antibody टेस्ट किट विकसित केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली. शरिरात Antibodys तयार झाल्या की नाहीत याचा माहिती यातून मिळणार असून उपचारासाठी त्याचा मोठा उपयोग होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. एका महिन्याच्या आता NIVने ही किट विकसित केली आहे. अतिशय कमी खर्चात आणि जलद गतीने आता अशा प्रकारच्या टेस्ट करता येणार आहेत. पुढील उपचारासाठी त्याचा मोठा उपयोग होईल अशी माहितीही त्यांनी दिली. कोरोनाचे राज्यातले आकडे हे दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे आणि मुंबईतलं कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी दिवसभरात पुण्यात 102 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. तर पाच करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात 194 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. 92 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 17 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. त्यामुळे पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 2482वर गेली आहे. तर आत्तापर्यंत 145 जणांचा मृत्यू झालाय. रविवारी मुंबईत 875 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे बाधितांचा आकडा 13 हजार 564 वर गेला आहे. तर आज 19 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतल्या मृत्यूची  एकूण संख्या 508 वर गेली आहे. परप्रांतीय मजुरांसमोर भाकरीचा प्रश्न! पुणे जिल्हा प्रशासनाने घेतला महत्त्वपूर्ण राज्यात रविवारी 1278 रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्याची एकूण संख्या 22 हजार 171वर गेली आहे. मुंबईत एक्स रे सॉफ्टवेअर या नव्या Artificial इंटेलीजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांची तपासणी केली जात आहे. राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशात पुण्यात पालिका आयुक्तांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात फिजिकल डिस्टंसिंगचं पालन न सोमवारपासून पुण्यात नियम कठोर करण्यात आले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा सोडल्या तर पुण्यात सर्व दुकानांवर बंदी घालण्यात आली आहे. पुण्यातील MPSC, UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मनसेनं उचललं पाऊल रेड झोन असलेल्या पुण्यामध्ये एकूण 69 कंटेनमेंट झोन्स आहेत. या भागात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे दवाखाने वगळता इतर दुकाने बंद राहणार असल्याचा निर्णय आयुक्तांकडून घेण्यात आला आहे. भाजीपाला, दूध हे पोलिसांच्या सहकार्यानं मोकळ्या मैदानात द्यायचा विचार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी पुणेकरांना सोमवारपासून कठोर नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या