Home /News /videsh /

तब्बल 130 दिवस व्हेंटिलेटरवर होती कोरोनाबाधित महिला, अचानक आली जाग आणि...

तब्बल 130 दिवस व्हेंटिलेटरवर होती कोरोनाबाधित महिला, अचानक आली जाग आणि...

कोरोनाची लागण झालेल्या 35 वर्षीय महिला 4 महिने 10 दिवस रुग्णालयात होती. तब्बल 130 दिवसांनंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

    लंडन, 19 जुलै : जगभरात कोरोनानं थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शनिवारी 24 तासांत 2 लाख 59 हजार 848 रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद झाली. मृतांचा आकडाही वाढत आहे. यातच ब्रिटनमध्ये एक चमत्कार घडला. कोरोनाची लागण झालेल्या 35 वर्षीय महिला 4 महिने 10 दिवस रुग्णालयात होती. तब्बल 130 दिवसांनंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिला रिकव्हरी वॉर्डमध्ये पाठवण्यात आले आहे. फातिमा असे या रुग्णांचे नाव असून ही ब्रिटनमधील प्रदीर्घ आजारी रुग्ण म्हणून ओळखली जाते. एका महिन्याआधी फातिमा मोरोक्कोवरून परतली होती. त्यानंतर तिला त्रास व्हायला लागला. मार्चमध्ये 56 वर्षीय फातिमामध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली. मिळालेल्या माहितीनुसार एप्रिलच्या अखेरीस फातिमा कोरोना मुक्त झाली होती, मात्र त्यानंतर तिला न्यूमोनिया झाला. कोरोनाला संसर्ग झाल्यानंतर, फातिमाची फुफ्फुसं कोलॅप्स झाली. आता तिच्या फुफ्फुसांची पूर्ण क्षमता कधीही परत येणार नाही. फातिमाला 12 मार्च रोजी ब्रिटनमधील साऊथॅम्प्टन जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यानंतर साडेतीन महिने ती व्हेंटिलेटरवर होती. नर्सला आणि डॉक्टरांना ती जगेल अशी आशा नव्हती मात्र एका रात्री अचानक चमत्कार घडला आणि फातिमा रिकव्हर झाली. फातिमानं निरोगी झाल्यानंतर डॉक्टर आणि नर्स यांचे आभार मानले. वाचा-24 तासांत 38 हजार 903 रुग्णांची नोंद, कोरोनाबाधितांची चिंताजनक आकडेवारी ब्रिटेनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनीही फातिमा यांच्या प्रकृतीवर आनंद व्यक्त केला आहे. हॅनकॉक म्हणाले की, हे सिद्ध करते की तुम्ही कोणीही असाल, ब्रिटनची राष्ट्रीय आरोग्य सेवा आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आहे. फातिमाचे पती ट्रेसी म्हणाले की- हा एक चमत्कारापेक्षा कमी नाही आहे. व्हेंटिलेटरवर इतक्या दिवसावर असल्यानंतर रिकव्हर होणे ही एक विलक्षण गोष्ट आहे. मी आता तिला भेटण्यासाठी उत्सुक आहे. वाचा-शास्त्रज्ञांना आढळलं कोरोनाव्हायरसचं नवं रुप, हरवण्याचा केवळ एकच उपाय जगात रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार सलग दुसऱ्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद झाली. शनिवारी 24 तासांत 2 लाख 59 हजार 848 रुग्णांची नोंद झाली. तर, शनिवारी अमेरिका, ब्राझील, भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशांमधून सर्वात जास्त रुग्णांनी नोंद झाली. याआधी शुक्रवारी 2 लाख 37 हजार 743 नवीन रुग्ण सापडले होते. 10 मेनंतर एका दिवसात सर्वात जास्त कोरोना मृतांची नोंद झाली आहे. 17 जुलै रोजी कोरोनानं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 7,360 पोहचली आहे. वाचा-अलर्ट! समोर आली कोरोनाची आणखी 6 नवी लक्षणं, वेळीच व्हा सावध
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india

    पुढील बातम्या