Home /News /news /

चिंतेत वाढ! शास्त्रज्ञांना आढळलं कोरोनाव्हायरसचं नवं रुप, हरवण्याचा केवळ एकच उपाय

चिंतेत वाढ! शास्त्रज्ञांना आढळलं कोरोनाव्हायरसचं नवं रुप, हरवण्याचा केवळ एकच उपाय

हैदराबादला कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढतो आहे. व्हायरसचा प्रसार वेगात असतानाही लोक सरकारने सांगितलेल्या नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. त्याचा फटका एका हिरेव्यापाऱ्याला बसला. या घटनेने हैदराबाद हादरुन गेलं आहे.

हैदराबादला कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढतो आहे. व्हायरसचा प्रसार वेगात असतानाही लोक सरकारने सांगितलेल्या नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. त्याचा फटका एका हिरेव्यापाऱ्याला बसला. या घटनेने हैदराबाद हादरुन गेलं आहे.

कोरोनाव्हायरसचे एक मोठे कुटुंब आहे, आणि त्याचे अनेक प्रकार आहेत. असाच एक नवा प्रकार आता दिसून येत आहे.

    नवी दिल्ली, 19 जुलै : जगातील शास्त्रज्ञ नवीन कोरोनाव्हायरसवर (Coronavirus) सतत संशोधन करत आहेत. सिंगापूरच्या काही शास्त्रज्ञांच्या पथकाने आता असा दावा केला आहे की जर कोणी यापूर्वी कोरोना झालेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कोव्हिड-19 विरूद्ध लढण्यासाठी मदत करू शकते. मात्र अद्यापही नवीन कोरोनाव्हायरस काय आहे, याबाबत संशोधन सुरू आहे. कोरोनाव्हायरसचे एक मोठे कुटुंब आहे, आणि त्याचे अनेक प्रकार आहेत. हा व्हायरसमुळे सामान्य सर्दी आणि तापपासून श्वसन समस्यांपर्यंतचे आजार होतात. 2002 मध्ये SARS मुळे चीनमध्ये साथीचा रोग झाला होता. हा सार्स आजारही कोरोनाशी संबंधित आहे. Sars-CoV-2 म्हणजे Severe acute respiratory syndrome असे नाव नवीन कोरोनाव्हायरसला देण्यात आले आहे. ज्यामुळे श्वसनाचा त्रास होतो. वाचा-मोठी बातमी! स्वदेशी कोरोना लशीच्या पहिल्या चाचणीसाठी महाराष्ट्रात 60 जण तयार रिसर्चमध्ये काय सिद्ध झाले यापूर्वी कोरोना किंवा SARS रुग्णांची यांची रोगप्रतिकार शक्ती काही दिवसांनी वाढते, म्हणजेच अशा लोकांमध्ये कोरोनाशी लढण्याची क्षमता वाढते. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार अशा लोकांमध्ये टी-सेल्स (T-cells) विकसित होतात. T-cells सहसा पांढऱ्या पेशी असतात. सिंगापूरमधील ड्यूक-नुस मेडिकल स्कूलमध्ये संसर्गजन्य रोगांचे प्राध्यापक डॉ. अँटोनियो यांच्या म्हणण्यानुसार 50 टक्के रुग्णांमध्ये T-cells आधीच विकसित झाल्या आहेत. वाचा-भारतीय कोरोना लशीचा असा होतोय परिणाम; COVAXINच्या चाचणीबाबत महत्त्वपूर्ण माहिती नवीन कोरोनाव्हायरस धोकादायक नवीन कोरोना व्हायरस खूप धोकादायक आहे. असे अनेकदा पाहिले गेले आहे की रुग्णांना या विषाणूची लागण दोनदा झाली आहे. सहसा, जेव्हा एखादी व्यक्तीला कोरोनाची लागण होते, तेव्हा प्रतिकारशक्ती बर्या च काळ टिकते. मात्र नवीन कोरोना विषाणूमध्ये असे दिसून आले आहे की बर्यााच वेळा रुग्णांची प्रतिकारशक्ती 2-3 महिन्यांत संपते. त्यामुळ त्यांना पुन्हा कोरोनाची लागण होण्याचा धोका असतो. वाचा-कोरोना लशीची माहिती हॅक करण्याचा केला जात आहे प्रयत्न, 'या' देशावर आरोप
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india

    पुढील बातम्या