सुक्रह, 26 मे : सुपरहिरोची क्रेझ प्रत्येकालाच असते. आपणही सुपरहिरो असावं असं सर्वांना वाटतं. सुपरहिरोसारखा ड्रेस घालणं ठिक आहे, मात्र सुपरहिरोच बनायचं आहे, यासाठी मुलं कोणत्याही स्तराला जाऊ शकतात याचं हे उदाहरण. स्पायडर मॅन (Spider Man) व्हायरसचं म्हणून बोलिव्हियातील (Bolivia) तीन भावांनी स्वत:ला विषारी कोळीकडून चावून घेतलं. यानंतर त्या कोळीचं विष त्यांच्या शरीरात पसरलं. चायांतामधील हे प्रकरणं. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार तिन्ही भाऊ सुपरहिरो स्पाइडर मॅनचे फॅन आहेत. त्यांनी फिल्ममध्ये पाहिलं होतं की ब्लॅक विडो प्रजातीचा कोळी चावल्यानंतर फिल्ममधील हिरो स्पाइडर मॅन होतो. त्यानंतर या तिन्ही भावांनी एका ब्लॅक विडो कोळीला शोधून काढलंच. शिवाय सलग 3 दिवस त्या कोळीकडून स्वत:ला चावून घेतलं. या मुलांपैकी एका मुलाचं वय आठ, एकाचं दहा आणि एकाचं बारा वर्ष असल्याचं सांगितलं जातं आहे. हे वाचा - उंदरांपासून सावध राहा! कोरोना लॉकडाऊनमध्ये झालेत आक्रमक; माणसांवर करताहेत हल्ला ब्लॅक विडो प्रजातीचा कोळी खूप विषारी मानला जातो. तो चावल्यानंतर अंगदुखी, पोटात वेदना, चक्कर येणं, हार्ट रेट वाढणं, बेशुद्ध होणं अशी लक्षणं दिसून येतात. अशा कोळीकडून या मुलांनी सलग 3 दिवस चावून घेतलं. ज्यामुळे त्यांच्या शरीरात त्याचं विष पसरलं आणि ते बेशुद्ध झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं सुरुवातीला त्यांना चायांता हेल्थ सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर त्यांना सूक्रहमधील लापाज चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पाच दिवसांनंतर या मुलांना डिस्चार्ज देण्यात आला. या घटनेनंतर देशाच्या आरोग्य मंत्रालयाचे सचिव व्हर्जिलियो पित्रेयो यांनी पालकांनी आपल्या मुलांवर नीट लक्ष ठेवण्याची सूचना जारी केली आहे. हे वाचा - 3 महिन्यांपासून कोविड -19 रुग्णालयाबाहेर मालकाची वाट पाहतोय कुत्रा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







