वॉशिंग्टन, 26 मे : लॉकडाऊनमध्ये (lockdown) अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने माणसांच्या स्वभावात बदल तर होतोच आहे, मात्र प्राण्यांचाही स्वभाव बदलू लागला आहे. तुम्ही कल्पनाही केली नसेल, मात्र अगदी छोटे उंदीरही (mice) माणसांवर हल्ला करू लागलेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, रोग नियंत्रण विभागाने नागरिकांना उंदरांपासून सावध राहण्याच सल्ला दिला आहे. युनायटेड स्टेट्स सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने एक सूचना जारी केली आहे. तज्ज्ञांच्या मते, लॉकडाऊनमध्ये भूकेमुळे उंदीर आक्रमक झाले आहेत. उंदीर आपल्या अन्नाच्या शोधात पहिल्यापेक्षा जास्त आक्रमक झालेत. हे वाचा - 3 महिन्यांपासून कोविड -19 रुग्णालयाबाहेर मालकाची वाट पाहतोय कुत्रा डेली स्टारच्या वृत्ताुसार, कोरोनाव्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे हॉटेल बंद आहेत. रेल्वे स्टेशन किंवा रस्त्यावरील खाद्यपदार्थांची छोटी छोटी दुकानंही बंद आहेत. उंदरांना अन्न या सर्व ठिकाणाहून मिळत होतं, मात्र आता ते मिळेनासं झालं आहे. त्यामुळे त्यांना खायला मिळत नाही आहे. आपलं अन्न शोधण्यासाठी त्यांना खूप कष्ट घ्यावे लागत आहेत. उंदरांना जिथून खायला मिळायचं ते स्रोत बंद झाल्याने आता ते नव्या स्रोताच्या शोधात आहेत. इकडे तिकडे फिरत आहेत आणि खायला मिळालं नाही तर ते माणसांवर हल्ला करत आहेत. हे वाचा - मास्क घातलाय? सोशल डिस्टन्सिंग ठेवताय? तुमच्यावर लवकरच तिसऱ्या डोळ्याची नजर त्यामुळे उंदरांपासून सावध राहा. तसंच उंदरांमुळे होणारे आजार पसरणार नाहीत याचीही खबरदारी घ्या. त्यासाठी साफसफाई ठेवा. अशा सूचना सीडीसीने दिल्यात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.