3 महिन्यांपासून कोविड -19 रुग्णालयाबाहेर मालकाची वाट पाहतोय कुत्रा

3 महिन्यांपासून कोविड -19 रुग्णालयाबाहेर मालकाची वाट पाहतोय कुत्रा

या कुत्र्याला अनेकांनी लांब सोडलं होतं, मात्र मालकाच्या शोधात कुत्रा रुग्णालयाबाहेर उभा राहतो

  • Share this:

बीजिंग, 26 मे : जगभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. चीनपासून सुरू झालेला कोरोनाचा कहर संपूर्ण जगभरात झाला आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात चीनच्या वुहानमध्ये कोरोनामुळे अनेकांना मृत्यू झाला. त्यापैकी एका व्यक्तीचा पाळीव कुत्रा तीन महिन्यांपर्यंत मालकाची वाट पाहत आहे.

हुबेईतील वुहानमध्ये एका पाळीव कुत्र्याला फेब्रुवारी महिन्यापासून एका रुग्णालयाबाहेर उभा आहे. त्यावेळी त्याचा मालक रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत होता. मात्र 5 दिवसांनी मालकाचा मृत्यू झाला. या घटनेला आता 3 महिन्यांचा काळ उलटला आहे. मात्र अद्यापही हा कुत्रा रुग्णालयाबाहेर आपल्या मालकाची वाट पाहत आहे.

मेट्रोच्या बातमीनुसार रुग्णालय प्रशासनानुसार 7 वर्षीय जिओ बाओ नावाचा एक पाळीव कुत्रा अनेकदा रुग्णालयाच्या लॉबीत येऊ बसतो. त्याला अनेकदा लांब दुसऱ्या भागात सोडण्यात आलं मात्र तरीही तो वारंवार रुग्णालयाच्या या लॉबीत येऊन मालकाची वाट पाहत आहे. गेल्या 3 महिन्यांपासून तो रुग्णालयाबाहेर मालकाची वाट पाहत आहे.

या कुत्र्याला रुग्णालयातील सुपरमार्केटमधून काहीना काही खायला दिलं जात आहे. तेथील सुपरमार्केटच्या मालकाने सांगितले की कुत्र्याचा मालिक कोरोना पॉझिटिव्ह होता व रुग्णालयातच त्याचा मृत्यू झाला. मात्र कुत्र्याला आपल्या मालकाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती नाही.

हे वाचा -चाचणी न घेता 9 जणांचे रिपोर्ट कोरोना प़ॉझिटिव्ह; प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड

कोरोनाचे रुग्ण अ‍ॅम्ब्युलन्सच्या खिडकीतूनच पडले बाहेर, धक्कादायक प्रकार

मास्क घातलाय? सोशल डिस्टन्सिंग ठेवताय? तुमच्यावर लवकरच तिसऱ्या डोळ्याची नजर

First published: May 26, 2020, 10:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading