Home /News /videsh /

Afghanistan Big News : शिया मशिदीत पुन्हा बॉम्बस्फोट, आतापर्यंत 16 ठार, 40 जखमी

Afghanistan Big News : शिया मशिदीत पुन्हा बॉम्बस्फोट, आतापर्यंत 16 ठार, 40 जखमी

अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा शिया मशिदीत जोरदार बॉम्बस्फोट (Bomb blast in Shiya Masjid of Afghanistan) झाल्याची माहिती आहे.

    काबुल, 15 ऑक्टोबर : अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा शिया मशिदीत जोरदार बॉम्बस्फोट (Bomb blast in Shiya Masjid of Afghanistan) होऊन 16 जण ठार झाल्याची माहिती आहे. या स्फोटात सुमारे 40 जण गंभीर जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानमधील कंधारमध्ये असणाऱ्या शिया (many feared died in bomb blast) समुदायाच्या मशिदीत हा स्फोट झाला असून अनेकजणांचा त्यात बळी गेल्याची माहिती ‘टोलो न्यूज’नं दिली आहे. शिया मशिदीत स्फोट अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये गेल्या शुक्रवारीच जोरदार बॉम्बस्फोट होऊन शेकडो जणांचा बळी गेला होता. त्यानंतर या शुक्रवारी पुन्हा एकदा शिया समजाच्या मशिदीला टार्गेट करण्यात आलं आहे. शुक्रवारच्या नमाजासाठी नागरिक एकत्र आले असतानाच हा जोरदार धमाका करण्यात आला. मृत्यूंचा नेमका आकडा अद्याप समोर आला नसला तरी अनेकजण त्यात दगावले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आयसीस-के वर संशय अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यापासून आयसीस खुरासान ही दहशतवादी संघटना सक्रीय झाली असून आतापर्यंत अनेक बॉम्बस्फोट त्यांनी घडवून आणले आहेत. तालिबानची सत्ता आल्यापासून अफगाणिस्तानात झालेले बहुतांश स्फोट हे याच संघटनेनं घडवून आणले आहेत. गेल्या शुक्रवारीदेखील शिया समाजाच्या मशिदीत नमाजावेळीच जोरदार स्फोट घडवण्यात आला होता. त्यात 100 पेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिया समाजाला टार्गेट करण्यात आलं असून कंधारच्या मशिदीत स्फोट घडवण्यात आला आहे. हे वाचा - सिंघु बॉर्डरवर हात कापून बॅरिकेटवर लटकवला तरुणाचा मृतदेह शिया विरुद्ध सुन्नी वाद अफगाणिस्तान हा सुन्नीबहुल मुस्लिमांचा देश आहे. तिथे शिया मुस्लिम अल्पसंख्याक आहेत. शिया मुस्लिमांना आयसीसचा विरोध आहे. शिया मुस्लिमांना संपवून देशात केवळ सुन्नी मुस्लिम जिवंत राहावेत, असं आयसीसचं धोरण आहे. त्यासाठी आयसीसनं जगभरात अनेकदा शिया मुस्लिमांना टार्गेट केलं आहे. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारनं आयसीस-के संघटनेच्या तळांवर हल्ले करून त्यांना धडा शिकवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतर आयसीसचे दहशतवादी अधिकच आक्रमक झाल्याचं चित्र दिसत आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Afghanistan, Bomb Blast, ISIS

    पुढील बातम्या