Home /News /national /

Singhu Border वर सापडला तरुणाचा मृतदेह, आंदोलकांच्या स्टेजजवळ हात कापून बॅरिकेटला लटकवलं

Singhu Border वर सापडला तरुणाचा मृतदेह, आंदोलकांच्या स्टेजजवळ हात कापून बॅरिकेटला लटकवलं

Singhu Border: सिंघू बॉर्डरवर जिथे शेतकरी आंदोलन करत आहेत, तिथे एका (young man) तरुणाच्या निर्घृण हत्या ( brutal murder) झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

    नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर: सिंघु बॉर्डरवरुन (Singhu Border) एक मोठी बातमी येत आहे. सिंघू बॉर्डरवर जिथे शेतकरी आंदोलन करत आहेत, तिथे एका (young man) तरुणाच्या निर्घृण हत्या ( brutal murder) झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, तरुणाचे हात कापून (cutting off his hand) त्याचा मृतदेह बॅरिकेट लटकवण्यात आला होता. मृतदेह बघितल्यानंतर बॉर्डरवर एकच गोंधळ सुरू झाला. सुरुवातीला आंदोलक पोलिसांना देखील मुख्य स्टेजजवळ जाऊ देत नव्हते. दरम्यान नंतर कुंडली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी मृतदेह खाली काढून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेला. सिंघु बॉर्डरवर आंदोलकांच्या मुख्य स्टेजजवळ सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह लटकलेला आढळून आला. मृत तरुणाचं वय जवळपास 35 वर्ष आहे. तरुणाच्या मृतदेहावर धारदार शस्त्रानं वार केल्याच्या खुणा आढळल्या आहेत. तसंच ज्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे त्याचे हात मनगटापासून कापण्यात आलेत. या हत्येचा आरोप निहंगांवर करण्यात आला आहे. हेही वाचा- नाशकात गरबा कार्यक्रमात शेकडो तरुण-तरुणींचा धांगडधिगा; पोलिसांनी दाखवला इंगा, पाहा VIDEO  ही घटना गुरुवारी रात्री घडली आहे. एवढेच नाही तर त्या तरुणाचा मृतदेह 100 मीटरपर्यंत ओढत नेण्यात आला आहे. त्याचवेळी, शुक्रवारी सकाळी आंदोलकांच्या मुख्य स्टेजजवळ युवकाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, तेव्हा खळबळ उडाली. दिल्ली, हरियाणा आणि यूपीच्या वेगवेगळ्या सीमेवर शेतकरी तीन नवीन कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. त्यासाठी शेतकरी गेल्या 9 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात अनेक बैठकाही झाल्या, पण आतापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Delhi, Farmer protest

    पुढील बातम्या