मराठी बातम्या /बातम्या /विदेश /बॉम्बस्फोटानं पुन्हा हादरलं काबुल, तालिबानच्या राज्यात दहशतवाद्यांचा उच्छाद

बॉम्बस्फोटानं पुन्हा हादरलं काबुल, तालिबानच्या राज्यात दहशतवाद्यांचा उच्छाद

अफगाणिस्तानची राजधानी (Bomb blast in Kabul once again) काबुल पुन्हा एकदा जोरदार स्फोटानं हादरली आहे.

अफगाणिस्तानची राजधानी (Bomb blast in Kabul once again) काबुल पुन्हा एकदा जोरदार स्फोटानं हादरली आहे.

अफगाणिस्तानची राजधानी (Bomb blast in Kabul once again) काबुल पुन्हा एकदा जोरदार स्फोटानं हादरली आहे.

काबुल, 20 ऑक्टोबर : अफगाणिस्तानची राजधानी (Bomb blast in Kabul once again) काबुल पुन्हा एकदा जोरदार स्फोटानं हादरली आहे. काबुलमधील देहमजांग स्क्वेअर परिसरात (Blast in Dehamjang square) पेरून ठेवलेल्या बॉम्बचा जोरदार स्फोट झाला. स्फोट झाला त्यावेळी या भागात वर्दळ कमी (No deaths so far in the blast) असल्याने अद्याप जीवितहानीची कुठलाही घटना घडलेली नाही. मात्र त्यामुळे काबुलमध्ये दहशतवाद्यांचा उच्छाद सुरूच असल्याचं यातून सिद्ध झालं आहे.

अफगाणिस्तानमध्ये आयसीसकडून स्फोट

काबुलमधील या स्फोटाची जबाबदारी अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेनं स्विकारलेली नाही. मात्र तालिबानसमोर सध्या आयसीस-के या दहशतवादी संघटनेचं सर्वात मोठं आव्हान निर्माण झालं आहे. गेल्या सलग दोन शुक्रवारी अफगाणिस्तानातील शिया मशिदींमध्ये जोरदार स्फोट झाले आहेत. दोन्ही स्फोटांमध्ये शेकडो नागरिकांचा बळी गेला आहे. गेल्या शुक्रवारच्या स्फोटात शंभरपेक्षा जास्त जण दगावले होते, तर त्यानंतर झालेल्या स्फोटात 80 पेक्षा अधिक जणांचा बळी गेला होता.

आयसीसीनं दिला होता इशारा

गेल्या शुक्रवारच्या स्फोटानंतर आयसीस-के संघटनेनं अफगाणिस्तानमधील सर्व शिया मुस्लिमांचं शिरकाण करण्याची घोषणा केली होती. शिया मुस्लीम हा जगासाठी धोका असून त्यांचा नायनाट करण्याची घोषणा आयसीस-के संघटनेनं पत्रक काढून केली होती. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या असून मोठ्या बॉम्बस्फोटांसोबत अनेक छोटे मोठे स्फोटही घडवून आणले जात असल्याचं चित्र आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

हे वाचा- बांग्लादेश मुस्लीम राष्ट्र नाही? हिंदू-मुस्लीम संघर्षावर ज्येष्ठ मंत्र्यांचं मत

काबुलमध्ये होतायत स्फोट

शिया समाजाच्या मशिदीतील हल्ल्यांसोबत काबुलमधील इतर ठिकाणीदेखील स्फोट होत असल्याच्या घटना घडत आहेत. गेल्या महिन्यात तालिबानी प्रवक्त्याच्या आईच्या शोकसभेवेळी मशिदीत जोरदार स्फोट झाला होता. त्यात पाच जण ठार झाले होते. त्या प्रकरणी पाच जणांना अटक केली असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये कमालाची दहशत निर्माण झाली आहे.

First published:
top videos

    Tags: Afghanistan, Bomb Blast, ISIS