जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / Corona Vaccine साठी काहीही! दोघींनी लस मिळवण्यासाठी केला मेकअप

Corona Vaccine साठी काहीही! दोघींनी लस मिळवण्यासाठी केला मेकअप

Corona Vaccine साठी काहीही! दोघींनी लस मिळवण्यासाठी केला मेकअप

कोरोनाची लस (Corona Vaccine) घेण्यासाठी लोक आता कोणत्याही थराला जाण्यास तयार असल्याचं दिसत आहे. अशाच दोन महिला कोरोनाची लस घेण्यासाठी गेल्या खऱ्या मात्र त्यांची रवानगी थेट तुरुंगात झाली.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 20 फेब्रुवारी : जगभरात कोरोनाचा प्रसार झालेला असताना आता लस (Corona Vaccine) उपलब्ध झाल्यानं नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, ही लस घेण्यासाठी लोक आता कोणत्याही थराला जाण्यास तयार असल्याचं दिसत आहे. अशाच दोन महिला कोरोनाची लस घेण्यासाठी गेल्या खऱ्या मात्र त्यांची रवानगी थेट तुरुंगात झाली. ही घटना अमेरिकेतील (America) आहे. जगभरातील इतर देशांप्रमाणेच अमेरिकेतही लसीकरणासाठी वृद्धांना प्राथमिकता देण्यात आली आहे. अशात फ्लोरिडामध्ये राहाणाऱ्या दोन महिलांनी असा विचार केला की त्या मेकअप करून म्हाताऱ्या बनून गेल्यास त्यांनी लस मिळेल. मात्र, त्यांची ही योजना असफल ठरली आणि पोलिसांनी दोघींनाही ताब्यात घेतलं. मात्र, नंतर त्यांना समज देऊन सोडण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांचं वय 34 आणि 44 वर्ष इतकं आहे. मात्र, त्यांनी मेकअप करत आपला पूर्ण लूकच बदलून टाकला. या दोघीही वृद्धाप्रमाणंच दिसत होत्या आणि विशेष म्हणजे त्यांच्यावर सुरुवातीला कोणाला संशयही आला नाही. दोघी केवळ लसीकरणाचं कार्ड बनवून घेण्यात सफल ठरल्या नाहीत, तर त्यांनी लसीचा पहिला डोसही घेतला. मात्र, दुसरा डोस घेण्याआधी त्यांचं नाटक उघड झालं. महिलांचा हा कारनामा समोर आल्यानंतर ऑरेंज काउंटीचे हेल्थ ऑफिसर (Health Officer) डॉ. रॉल पीनो अक्षरशः  हैराण झाले. ते म्हणाले, की या महिलांचं खरं वय कोणीच ओळखू शकलं नाही ही आश्चर्यकारक बाब आहे. महिलांनी स्वतःला असं तयार केलं होतं, की त्यांचं वय 65 वर्ष वाटत होतं. पीनो म्हणाले, की ही बाब अतिशय गंभीर असून अधिक सतर्क राहाण्याची गरज आहे. फ्लोरिडामध्ये लसीची मागणी खूप जास्त आहे. कोरोनाचं संकट दूर ठेवण्यासाठी लोक लवकरात लवकर लसीकरण करू इच्छितात. मात्र, खराब वातावरणामुळे लसी पोहोचण्यास उशीर होत असून लोकांना बराच काळ प्रतिक्षा करावी लागत आहे. आतापर्यंत याठिकाणच्या 65 वर्षाहून अधिक वय असणाऱ्या 44 लाख लोकांपैकी 42 टक्के लोकांना लसीकरण केलं गेलं आहे. सोबतच आरोग्य कर्मचारी आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या लोकांनाही लस दिली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात