जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / Blast In China Restaurant : ड्रॅगन बोट फेस्टिवल बनलं मृत्यूचं घर, स्फोटात 31 जणांचा होरपळून मृत्यू

Blast In China Restaurant : ड्रॅगन बोट फेस्टिवल बनलं मृत्यूचं घर, स्फोटात 31 जणांचा होरपळून मृत्यू

चीनमध्ये ब्लास्ट

चीनमध्ये ब्लास्ट

या सणाला राष्ट्रीय सुट्टी घोषित केली जाते, त्यामुळे बरेच जण या फेस्टिवलचा आनंद लुटण्यासाठी जमलेले होते. रात्री 8.40 च्या सुमारास स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

बिजिंग : ड्रॅगन बोट फेस्टिवलचा आनंद लुटण्यासाठी जगभरातून लोक आले होते. सगळं काही सुरळीत सुरू होतं आणि अचानक जे घडलं त्याने काळजाचा ठोका चुकला. या फेस्टिवलमध्ये एकामागे एक स्फोटाचा आवाज झाला आणि अचानक आग लागली. ड्रॅगन बोट फेस्टिवल मृत्यूचं घर बनलं आहे. या स्फोटात 31 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. उत्तर-पश्चिम चीनमधील ‘बार्बेक्यु’ रेस्टॉरंटमध्ये गॅसचा भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर आग लागली. यामध्ये होरपळून 31 जणांचा मृत्यू झाला आहे. 7 जण जखमी झाले. चिनी अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

Nuclear Blast ची सोशल मीडियावर चर्चा, नक्की असं काय घडलं?
News18लोकमत
News18लोकमत

ड्रॅगन बोट फेस्टिव्हलच्या सुट्टीच्या पूर्वसंध्येला निन्जियाहुई स्वायत्त प्रदेशाची राजधानी यिनचुआन येथील व्यस्त रस्त्यावर लोक जमले होते, असे सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआ यांनी माहिती दिली. या सणाला राष्ट्रीय सुट्टी घोषित केली जाते, त्यामुळे बरेच जण या फेस्टिवलचा आनंद लुटण्यासाठी जमलेले होते. रात्री 8.40 च्या सुमारास स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली.

War video: गाडी चालवताना अचानक समोर बॉम्ब पडतो तेव्हा..! रशिया अशी डागते मिसाईल्स

आगीमुळे भाजलेल्या 7 जणांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. काचा फुटल्याने 7 जण गंभीर जखमी झाले. तर या घटनेनंतर आजूबाजूच्या दुकानांमध्येही आग पसल्याची माहिती मिळाली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आणि कूलिंग ऑपरेशनचं काम सुरू आहे. लिक्विड पेट्रोलियम गॅस लीक झाल्याने हा स्फोट झाल्याचं सांगण्यात आलं आहे. ही गॅस गळती कशी झाली याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: china
  • First Published :
जाहिरात
जाहिरात