जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Nuclear Blast ची सोशल मीडियावर चर्चा, नक्की असं काय घडलं?

Nuclear Blast ची सोशल मीडियावर चर्चा, नक्की असं काय घडलं?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आता या काळात जर महायुद्ध सुरु झालं तर जगाचं काही खरं नाही अशी भीती अनेकांच्या मनात आहे. कारण न्यूक्लिअर ब्लास्ट किती धोकादायक आहे, हे काही वेगळं सांगायची गरज नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 03 फेब्रुवारी : ट्वीटरवर अचानक न्युक्लिअर ब्लास्ट हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे. जो पाहून खळबळ उडाली आहे. या ब्लास्टनंतर आता महायुद्धाला सुरुवात होतेय की काय असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे. युक्रेन-रशियाच्या युद्धाबद्दल तर सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे तिथेच काही झालंय का? असा प्रश्न लोकांना पडला आहे. ज्यामुळे लोक इंटरनेटवर न्युक्लिअर ब्लास्ट #Nuclear Blast सर्च करु लागले आहेत. आता या काळात जर महायुद्ध सुरु झालं तर जगाचं काही खरं नाही अशी भीती अनेकांच्या मनात आहे. कारण न्यूक्लिअर ब्लास्ट किती धोकादायक आहे, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. पण घाबरण्याची गरज नाही, ट्वीटरवर न्युक्लिअर ब्लास्ट वेगळ्याच कारणासाठी ट्रेंड होऊ लागला आहे. खरंतर साउथचा एक्टर विजय थालापती याच्या एका सिनेमाचा ट्रेलर आज म्हणजे 03 फेब्रुवारीला लाँच झाला आहे. त्यामुळे त्याचे फॅन न्युक्लिअर ब्लास्ट असं त्याच्या सिनेमा आणि ट्रेलरला म्हणत आहेत. साउथ इंडियन अभिनेता विजय थालापती याचा लिओ-ब्लडी स्वीट (LEO - Bloody Sweet) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर शुक्रवारी रिलिज झाला. हा ट्रेलर, विजयची एक्टिंग पाहून त्याचे चाहाते हा सिनेमा म्हणजे सिनेमा जगात न्युक्लिअर ब्लास्ट असल्याचे म्हणत आहेत.

    जाहिरात

    तसे पाहाता विजयच्या अभिनयाबद्दल वेगळं असं काय म्हणणार, तो एक उत्तम अभिनेता आहेच, त्यामुळे त्याचा आता हा सिनेमा न्युक्लिअर ब्लास्ट करणार का? हे पाहाणं महत्वाचं ठरेल. सोशल मीडियावर या संबंधीत अनेक मीम्स देखील व्हायरल होऊ लागले आहेत, चला यावर एक नजर टाकू.

    जाहिरात
    जाहिरात
    जाहिरात

    या ट्रेंडने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात