जिनिव्हा, 22 मार्च : कोरोनाव्हायरस (Coronavirus) इतक्या झपाट्याने पसरतो आहे, की फक्त डिफेंड करून आपण लढाई जिंकू शकत नाही, तर अटॅकही करायला हवा, असं जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) चीफ टेड्रॉस गेब्रयासस ( Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी सांगितलं. सुरुवातीला जगभरात कोरोनाव्हायरसचे 11 दिवसांत 1 लाख रुग्ण सापडले, त्यानंतर आणखी 11 दिवसांनी दुसरे 1 लाख रुग्ण सापडले आणि तिसऱ्या वेळी आढळलेले 1 लाख रुग्ण फक्त 4 दिवसांतच सापडलेत. इतक्या वेगानं हा व्हायरस पसरत आहे. हे वाचा - कोरोनाचा महाभयंकर टप्पा, 4 दिवसात तब्बल 1 लाख लोकांना या व्हायरसची लागण कोरोनाव्हायरसला हरवता येऊ शकतं, मात्र त्याच्याशी लढण्यासाठी फुटबॉल (football) मॅचची रणनीती वापरावी लागेल, असं टेड्रॉस गेब्रयासस म्हणाले. फिफ आणि डब्ल्यूएचओने जगातील प्रसिद्ध फुटबॉलपटूंच्या मदतीने कोरोनाव्हायरसविरोधात मोहीम सुरू केली आहे. पास द मेसेज टू किक आऊट कोरोनाव्हायरस असं या मोहिमेचं नाव आहे. ज्यामार्फत जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार लोकांना कोरोनाव्हायरसपासून वाचण्याचे उपाय सांगण्यात आलेत.
Pass the message: Five steps to kicking out #coronavirus:
— World Health Organization (WHO) (@WHO) March 23, 2020
WHO and @FIFAcom launched joint campaign to equip football ⚽ community to tackle #COVID19 👉 https://t.co/SQ5DZgdU3Upic.twitter.com/ojGBcq9U4k
हा व्हिडीओ 13 भाषांमध्ये तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये 28 खेळांडूंचा समावेश आहे. ज्यामध्ये पूर्व भारतातील कॅप्टन छेत्री, अर्जेंटिनाचे सुपरस्टार लिओनेल मेसीसह फिलिप लाहम, इकर कॅसिलास आणि कार्ल्स पुयोल यांच्यासारख्या विश्वकप विजेत्यांच्या समावेश आहे.
"The rule of the game to kick #COVID19 out is solidarity"-@DrTedros #coronavirus
— World Health Organization (WHO) (@WHO) March 23, 2020
टेड्रॉस गेब्रयासस म्हणाले, “फुटबॉल मॅच फक्त डिफेंड करून जिंकता येत नाही, तर अॅटकही करावा लागेल.अशीच रणनीती कोरोनाव्हायरसला हरवण्यासाठी वापरावी लागेल. नागरिकांनी घरात राहणं, कुणाशी जास्त थेट संपर्क न ठेवणं हा कोरोनाव्हायरसला प्रसार रोखण्याचा महत्त्वपूर्ण असा मार्ग आहे. मात्र हा संरक्षणात्मक उपाय आहे, व्हायरसला हरवणं शक्य नाही. व्हायरसविरोधात लढा जिंकण्यासाठी आक्रमक अशा रणनीतीने हल्ला करण्याची गरज आहे. प्रत्येक संशयिताचं परीक्षण, त्याला वेगळं ठेणं आणि कोरोनाग्रस्त रुग्णांची योग्य देखभाल, त्याच्याशी संपर्कात आलेल्या लोकांना शोधणं, त्यांना आयसोलेट करणं ही आपली प्राथमिकता असायला हवी” हे वाचा - Corona चा पहिला रुग्ण सापडला, ज्याच्यामुळे संपूर्ण देश व्हायरसच्या विळख्यात आला