Home /News /videsh /

तालिबानी गोंधळात हरवलेल्या बाळाचा लागला शोध, पाच महिन्यांनी परतलं घरी

तालिबानी गोंधळात हरवलेल्या बाळाचा लागला शोध, पाच महिन्यांनी परतलं घरी

अफगाणिस्तान सोडण्याच्या धावपळीत हरवलेलं 2 महिन्यांचं बाळ अखेर सापडलं. आता हे बाळ 7 महिन्याचंं झालंय आणि लवकरच आईवडिलांना भेटणार आहे.

    काबूल, 11 जानेवारी: अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता प्रस्थापित होत असताना सुरु असलेल्या गोंधळात (Caeos) एक बाळ (Baby lost) हरवलं होतं. विमानतळावर (Airport) हे बाळ त्याच्या आईवडिलांनी एका सैनिकाकडे (Soldier) सोपवलं आणि नंतर ते बाळ मिळालंच नाही. त्या गोंधळात बाळाचं काय झालं, हे कुणालाच समजत नव्हतं. अखेर पाच महिन्यांनी या बाळाचा शोध लागला असून ते सुखरूप असल्याचं स्पष्ट झालं आहे.  असं हरवलं बाळ गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात तालिबाननं अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर ताबा मिळवला. त्यावेळी लाखो नागरिक देश सोडून बाहेर पडण्याच्या गोंधळात होते. विमानतळावर अभूतपूर्व गर्दी जमली होती आणि अक्षरशः चेंगराचेंगरी सुरू झाली होती. तालिबानच्या तावडीतून आपले प्राण वाचवून विमान पकडण्याच्या घाईत असणाऱ्या एका कुटुंबानं आपलं दोन महिन्यांचं बाळ तिथल्या एका तालिबानी सैनिकाकडे सोपवलं. मनावर दगड ठेवत त्यांनी आपल्या बाळाचा ताबा सैनिकाकडे दिला. विमानतळावर आणि विमानात चेंगराचेंगरी होऊन बाळाच्या जीवाला धोका निर्माण होईल, असं वाटल्याने आपण हा निर्णय़ घेतल्याचं त्यांनी सांगितलं. अनोळखी व्यक्तीने केला सांभाळ आपल्या हातातील बाळाला बाजूला ठेऊन तालिबानी सैनिक तिथून निघून गेला. या बाळाचं नाव सोहेल अहमद. ररस्त्याने चाललेल्या हमीद साफी नावाच्या एका टॅक्सी ड्रायव्हरची नजर या बाळावर पडली. दया येऊन त्याने ते बाळ घरी आणलं आणि त्याचा सांभाळ सुरू केला. हे आपलंच बाळ आहे, असं समजून त्याने बाळाची जबाबदारी घेतली.  सोशल मीडियावर व्हायरल बाळाचे आईवडील अमेरिकेत गेले तर त्याचे आजीआजोबा काबूलमध्येच राहिले. आपला नातू काबूलमध्येच असून हमीद साफी नावाच्या टॅक्सी ड्रायव्हरकडे असल्याचं त्यांना समजलं. त्यावर त्यांनी हमीदशी संपर्क साधला. मात्र हमीदला तोपर्यंत बाळाचा लळा लागला होता आणि बाळ सोपवायला त्याने स्पष्ट नकार दिला. गेल्या सात आठवड्यांपासून बाळाचे आजी आणि आजोबा हमीदची समजूत काढत होते आणि त्याला विनवणी करत होते. हे वाचा - बाळ जाणार अमेरिकेत अखेर हमीदला दया आली आणि त्याने बाळाला त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवण्याची तयारी दाखवली. बाळ सध्या काबूलमध्येच असलेल्या त्याच्या आजी-आजोबांकडे सोपवण्यात आलं असून लवकरच अमेरिकेतील आपल्या आईवडिलांकडे त्याला पोहोचवण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Afghanistan, Airport, Kabul, Small baby

    पुढील बातम्या