पॅरीस 13 ऑगस्ट : लिफ्टमध्ये अडकून एका चिमुकल्याचा आपल्या आईच्या डोळ्यांसमोर दुर्देवी मृत्यू झाल्याची भयंकर घटना (Horrific Incident) समोर आली आहे. ही घटना तेव्हा घडली जेव्हा महिला आपल्या बाळाला घेऊन लिफ्टमध्ये जात होती. तेव्हाच दरवाजा बंद होण्याआधीच लिफ्ट वरच्या बाजूला जाऊ लागली आणि यातच अडकून बाळाचा (Baby Crushed By a Lift) मृत्यू झाला. महिलेनं आपल्या बाळाला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ती अपयशी ठरली.
द सननं दिलेल्या वृत्तानुसार, महिला गुलपेरी करसाल आपल्या बाळाला प्रॅममध्ये (Pram) ठेवून कुठेतरी घेऊन जाण्याच्या तयारीत होती. अपार्टमेंटची लिफ्ट उघडताच महिलेनं लिफ्टमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती पूर्णपणे आतमध्ये येण्याआधीच लिफ्ट वरती जाऊ लागली. लिफ्टसोबतच प्रॅमदेखील वरती जाऊ लागलं. मात्र, भिंत आणि लिफ्टच्या मध्ये अडकल्यानं ते पूर्णपणे तुटलं.
बंदूक नाही, तर चिठ्ठी घेऊन बँकेत चोरी करायला पोहोचला चोर, मजकूर वाचून सगळे थक्क
करसाल प्रॅम पकडून खाली ओढण्याचा प्रयत्न करत राहिली, मात्र लिफ्टच्या ताकतीपुढे ती काहीच करू शकली नाही. यानंतर अचानक बाळ लिफ्टच्या शाफ्टमधून 20 फूट खाली कोसळलं. गुलपेरी करसाल बाळाला घेऊन रुग्णालयातही पोहोचल्या. मात्र, तोपर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता. ही भयंकर घटना बिल्डिंगमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
पोलिसांनी सांगितलं की घटनेच्या वेळी गुलपेरी करसालनं आसपासच्या फ्लॅटमधील लोकांकडे मदतही मागितली, मात्र बाळाला वाचवता आलं नाही. पोलिसांनी प्रकरणाचा तपासही सुरू केला आहे. लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याची प्रकरणं याआधीही समोर आली आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातही एका मुलाचा असाच लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला होता. हा मुलगा आपल्या आजोबांसोबत खेळत होता. अचानक तो लिफ्टजवळ गेला. कोणाला काही लक्षात येईल याआधी लिफ्ट आणि छताच्या मध्ये अडकून त्याचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Baby died, Horrifying, Viral news