लाहौर, 20 जानेवारी: ईशनिंदा (
Blasphemy) केल्याच्या आरोपाखाली एका पाकिस्तानी महिलेला (
Pakistan woman) न्यायालयानं मृत्यूदंडाची (
Death sentence) शिक्षा सुनावली आहे. या महिलेनं व्हॉट्सअपवरून (
WhatsApp) प्रॉफिट मोहम्मद (
Prophet Muhammad) यांची खिल्ली उडवणारा मेसेज पाठवला होता. ज्या व्यक्तीला हा मेसेज पाठवण्यात आला, त्याने तक्रार केल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं होतं. पाकिस्तानात धार्मिक भावना दुखावणे आणि धर्माविषयी कुठलेही अपशब्द काढणे, हा गुन्हा मानला जातो. अशा प्रकारांमुळे धार्मिक भावना भडकून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचं गृहित धरत पाकिस्ताननं या आरोपांसाठी मृत्यूदंडाच्या शिक्षेची कायद्यात तरतूद केली आहे.
अशी घडली घटना
पाकिस्तानातील अनिक्वा अतिक नावाच्या महिलेनं तिच्या मित्राला व्हॉट्सअपवरून एक मेसेज पाठवला होता. त्यात मोहम्मद यांची खिल्ली उडवण्यात आल्याचं दिसत होतं. या गोष्टीचा तिच्या मित्राला राग आला आणि त्याने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर मे 2020 मध्ये अनिक्वाला पोलिसांनी अटक केली होती. व्हॉट्सअपवरून पाठवलेल्या एका कॅरिकॅचरमुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप अनिक्वाच्या मित्राने केला होता. त्यानंतर वर्षभर चाललेल्या या खटल्याचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. कोर्टाने अनिक्वाला मृत्यूदंडाची शिक्षा आणि त्याशिवाय 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे याचाच अर्थ अगोदर तिला 10 वर्ष तुरुंगात राहावं लागेल आणि त्यानंतर तिला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे.
हे वाचा -
वैयक्तिक शस्त्रुत्वासाठी गैरवापर
पाकिस्तानमध्ये ईशनिंदेबाबतच्या कायद्याचा अनेकदा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विविध सामाजिक संघटनांनी केला आहे. वैयक्तिक हेवेदावे, बदला घेणं, धडा शिकवणं यासारख्या उद्दिष्टांसाठी जाणीवपूर्वक अशा प्रकरणांमध्ये अडकवण्यासाठी या कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचं वारंवार दिसून आलं आहे. काही महिन्यांपूर्वीच सियालकोटमध्ये प्रियंथा कुमारा या श्रीलंकन नागरिकाला नागरिकांच्या जमावाने ठार केल्याची घटना घडला होती. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.