भारताने विमानं केली होती रद्द अमेरिकेत काही विमानतळांवर 5G यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्यामुळे अनेक विमानांना लँडिंग करताना अडथळे येत होते. त्यामुळे बुधवारपासून ही उड्डाणं रद्द करण्यात आली होती. ज्या विमानतळांवर 5G यंत्रणा आहे, त्या ठिकाणची फ्रिक्वेन्सी ही विमानाच्या यंत्रणेतील फ्रिक्वेन्सीच्या जवळचीच असल्यामुळे खराब हवामानात विमान लँड करणं, हे पायलटसाठी आव्हानात्मक ठरत होतं. या पार्श्वभूमीवर सर्व कंपन्यांनी आपापल्या विमानातील यंत्रणा अद्ययावत करू घ्याव्यात, अशा सूचना अमेरिकेनं केल्या होत्या. त्यानुसार आता आपल्या सर्व विमानांतील यंत्रणा अपडेटेड असून सध्या अमेरिकेतील फेऱ्या सुरू करण्यास काहीही हरकत नसल्याचं उत्पादक कंपनीकडून सांगण्यात आल्याची माहिती ‘एअर इंडिया’ने दिली आहे. हे वाचा - बोइंग 777 ला अडथळा नाही अमेरिकेने आपल्या काही विमानतळांवरील यंत्रणा अद्ययावत करत 5G मोबाईल नेटवर्क इन्स्टॉल केलं आहे. त्यामुळे अनेक विमानांना लँडिंग करताना अडथळे निर्माण होत आहेत. यूएस फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन (FAA) च्या मते, नवीन 5G तंत्रज्ञान विमान जमिनीपासून किती अंतरावर आहे हे मोजणाऱ्या तसंच ऑटोमेटेड लँडिंग सुलभ करण्यासाठी आणि विंड शीअर नावाचे धोकादायक प्रवाह शोधण्यात मदत करणाऱ्या अल्टिमीटरसारख्या उपकरणांमध्ये अडथळा निर्माण करू शकते. कारण अल्टिमीटर्स (Altimeters) 4.2-4.4 GHz या फ्रिक्वेन्सीमध्ये कार्य करतात आणि मोबाइल नेटवर्क सेवेसाठी देण्यात आलेली फ्रिक्वेन्सी याच्या खूप जवळ आहे. मात्र ताज्या माहितीनुसार बोइंग 777 या प्रकारच्या विमानातील यंत्रणांना नव्या 5G यंत्रणेचा कुठलाच अडथळा येणार नाही, असं आता अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशऩ ऍडमिनिस्ट्रेशनने स्पष्ट केलं आहे.#FlyAI : Flight operations to/from destinations in USA were affected during last two days.
We would like to inform our passengers traveling to/from destinations in the USA that effective 0001hrs of 21st January 2022 normal flights operations will recommence to/from USA. — Air India (@airindiain) January 20, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.