लाहोर, 08 ऑगस्ट: काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील (Pakistan) रहीम यार खान (Rahim Yar Khan) जिल्ह्यातील भोंग (Bhong) शहरात काही समाजकंठकांनी हिंदू मंदिराची तोडफोड (Hindu temple Vandalism) केली होती. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (Viral video) झाल्यानंतर पाकिस्तानवर चौफेर टीका करण्यात येत होती. संबंधित आरोपींवर पोलिसांकडून देखील कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती.
पण पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं या घटनेची दखल घेतल्यानंतर, संबंधित समाजकंठकांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी व्हिडीओच्या आधारे आतापर्यंत 50 जणांना अटक केली आहे. तसेच 150 हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
बुधवारी 4 ऑगस्ट रोजी पाकिस्तानातील बहुसंख्य असणाऱ्या मुस्लीम समुदायातील काही समाजकंठकांनी हिंदू समुदायाच्या गणेश मंदिराची तोडफोड केली होती. लाहोर शहरापासून 590 किमी अंतरावर असणाऱ्या रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग याठिकाणी ही घटना घडली होती. तोडफोड करणाऱ्या तरुणांचं विकृत कृत मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं होतं.
You are free to go you temple? Watch this brazen attack on a temple in the broad daylight. Another bad day for #Hindus as Ganesh #Temple in Bhong city of Rahimyar Khan was attacked by miscreants. The beasts daringly live telecast the attack on Facebook: https://t.co/uVq8UYBkQB pic.twitter.com/SzGrtIxEzk
— Kapil Dev (@KDSindhi) August 4, 2021
हेही वाचा-अजूनही त्या संहाराच्या जखमा कायम, अणुबाँब हल्ल्यासाठी USA ने का निवडले Hiroshima
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून आतापर्यंत एकूण 50 जणांना अटक (50 Arrest) केली आहे. येत्या काळात आणखी बऱ्याच जणांना अटक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पाकिस्तानातील पोलीस अधिकारी असद सरफराज यांनी दिली आहे.
हेही वाचा-खुलेआम AK-47 रायफल घेऊन फिरत होती महिला; Video समोर आल्यानंतर पोलीस अलर्ट
असद यांनी पुढे सांगितलं की, मंदिरावर हल्ला करणाऱ्या 150 हून अधिक लोकांवर दहशतवाद पसरवणे आणि पाकिस्तान दंड संहितेतील (पीपीसी) अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, संबंधित तोडफोड करण्यात आलेल्या मंदिराच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pakistan