• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • पुन्हा हादरलं काबुल, शक्तिशाली स्फोटात 19 ठार; 50 हून अधिक जखमी

पुन्हा हादरलं काबुल, शक्तिशाली स्फोटात 19 ठार; 50 हून अधिक जखमी

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये झालेल्या शक्तीशाली स्फोटात किमान 19 जण ठार (At least 19 died in Kabul suicide bomber attack) झाल्याची माहिती समोर आली आहे.

 • Share this:
  काबुल, 2 नोव्हेंबर: अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये झालेल्या शक्तीशाली स्फोटात किमान 19 जण ठार (At least 19 died in Kabul suicide bomber attack) झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात आतापर्यंत 50 पेक्षा (More than 50 people injured) अधिक नागरिक जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काबुलच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये (Blast in military hospital) हे स्फोट झाले असून याागेही आयसीस-के या संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकामागोमाग दोन स्फोट काबुलपासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये पहिला आत्मघाती बॉम्बस्फोट घडवण्यात आला. त्यानंतर काही मिनिटांतच या हॉस्टिपलच्या बाहेर दुसरा स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तीशाली होता की 19 जण या स्फोटात जागीच ठार झाले. 50 पेक्षा अधिक नागरिक यात गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. एएफपी न्यूज एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार एक सुसाईट बॉम्बर आणि बंदूकधारी या दोघांनी मिळून हा हल्ला केला. तालिबानचं मौन तालिबान सरकारकडून या स्फोटांबद्दल अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच आयसीस-के संघटनेचा बंदोबस्त करू, असा इशारा देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच तालिबान सरकारकडून आयसीस-के संघटनेला इशारा देण्यात आला होता. त्यानंतर थेट मिलिटरी हॉस्पिटलवर हा हल्ला घडवून आल्याचं सांगितलं जात आहे. हे वाचा- येथे लग्नासाठी पाहुणे भाड्याने मिळतील! वाचा, एका तासाचा दर ‘आयसीस-खुरासान’वर संशय या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुठल्याही संघटनेनं स्विकारलेली नाही. मात्र आयसीस खुरासान या संस्थेनंच हा धमाका घडवून आणला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तालिबानचं सरकार अफगाणिस्तानमध्ये आल्यापासून ही संघटना सक्रीय झाली आहे. तालिबान इस्लाम आणि जिहादविरोधी असून त्यांची सत्ता उलथवून लावण्याच्या उद्देशाने आयसीस-खुरासान ही दहशतवादी संघटना कार्यरत आहे. त्यामुळे या संघटनेकडून आतापर्यंत अनेक स्फोट घडवून आणण्यात आले आहेत. तालिबानची सत्ता  खिळखिळी करणं, हा आयसीस-खुरासान संघटनेचा मुख्य उद्देश आहे. मात्र त्यामुळे सर्वसामान्यांचे बळी जात आहेत.
  Published by:desk news
  First published: