• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • येथे लग्नासाठी पाहुणे भाड्याने मिळतील! वाचा, एका तासाचा दर

येथे लग्नासाठी पाहुणे भाड्याने मिळतील! वाचा, एका तासाचा दर

जगात एक असा देश आहे, जिथं लग्नासाठी पाहुणे (Companies provide guest on rent per hour) भाड्यानं मागवण्याची सोय आहे.

 • Share this:
  जगात एक असा देश आहे, जिथं लग्नासाठी पाहुणे (Companies provide guest on rent per hour) भाड्यानं मागवण्याची सोय आहे. भारतात आता लग्नसराईचा काळ सुरू होईल. दोन वर्षं कोरोना संकटामुळे अनेक लग्नं साध्या पद्धतीनं आणि मोजक्या लोकांच्या (Restrictions on marriage ceremonies) उपस्थितीत पार पडली. मात्र आपले पाहुणे, मित्र आणि इतरांना बोलावून धुमधडाक्यात लग्न करण्याकडे भारतीयांचा कल असतो. इथं प्रत्येकालाच अनेक (Friends and relatives) नातेवाईक आणि मित्र असतात. त्यामुळे लग्नासाठी आपोआप गर्दी जमते. मात्र काही देश असे आहेत, जिथं लग्नासाठी म्हणून बोलवायला पाहुणेच नसतात. लोकांची ही गरज लक्षात घेऊन काही कंपन्यांनी लग्नासाठी भाड्यानं माणसं पुरवायला सुरुवात केली आहे. दक्षिण कोरियात नवा व्यवसाय दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया ही एकमेकांची शत्रूराष्ट्रं. मात्र तरीही या दोन्ही देशांत अऩेक नागरिकांचे नातेवाईक राहतात. कोरोना काळापासून उत्तर कोरियानं आपल्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे दक्षिण कोरियातील नागरिकांना उत्तर कोरियातील पाहुण्यांना लग्नासाठी बोलावता येत नाही. पाहुणे म्हणजे प्रतिष्ठा दक्षिण कोरियात श्रीमंतीचा एक अनोखा निकष आहे. ज्याच्या लग्नात अधिक पाहुणे येतील, ती व्यक्ती अधिक श्रीमंत असं इथं मानलं जातं. मात्र या छोट्याशा देशात अगोदरच लोकसंख्या कमी आणि त्यात शेजारील देशातून पाहुणे येऊ शकत नसल्यामुळे या नव्या व्यवसायानं जोर धरला आहे. लग्नात गर्दी जमवण्यासाठी पाहुण्यांना तुम्ही भाड्याने बोलावू शकता. ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या पोषाखात पाहुणे येतात आणि तुमच्या लग्नकार्यातला आनंद द्विगुणित करतात. पाहुण्यांना मिळतं ट्रेनिंग तुमच्या लग्नात भाड्यानं आलेले पाहुणे हे भाड्याचे आहेत, असं कुणालाही वाटणार नाही. त्यांना लग्नात कसं वागावं याचं इतकं उत्तम प्रशिक्षण दिलेलं असतं की बघणाऱ्याला ते खरेच पाहुणे आहेत, असं वाटतं. ते मनापासून लग्नकार्यात सहभागी होतात आणि घरचंच लग्न असल्यासारखा सर्व बाबतीत पुढाकार घेत असतात. हे वाचा- बाबो! तो सुट्टीवरून परतला, पाहतो तर काय? अख्खं घरच्या घरच गायब अनेकांना मिळाले रोजगार चांगलं व्यक्तीमत्त्व असणाऱ्या आणि बऱ्यापैकी अभिनय येणाऱ्या नागरिकांना या व्यवसायात जास्त मागणी आहे. योग्य प्रशिक्षणानंतर अशा नागरिकांची घसघशीत कमाई सुरू होते. एका तासासाठी साधारणपणे `1500 रुपये एक पाहुणा घेतो. त्यानुसार जितके पाहुणे तुम्ही बोलवाल, तितके पैसे यजमानाला मोजावे लागतात.
  Published by:desk news
  First published: