Home /News /videsh /

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये 4 जणांना ठेवलं ओलिस, बंदुकधाऱ्याकडून पाकिस्तानी शास्त्रज्ञाच्या सुटकेची मागणी

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये 4 जणांना ठेवलं ओलिस, बंदुकधाऱ्याकडून पाकिस्तानी शास्त्रज्ञाच्या सुटकेची मागणी

अमेरिकेतील (United States)टेक्सासमध्ये (Texas) 4 जणांना ओलीस (US Hostage) ठेवण्यात आलं आहे.

    न्यूयॉर्क, 16 जानेवारी: अमेरिकेतील (United States)टेक्सासमध्ये (Texas) 4 जणांना ओलीस (US Hostage) ठेवण्यात आलं आहे. लोकांना ओलीस ठेवणाऱ्यांनी पाकिस्तानी शास्त्रज्ञ आफिया सिद्दिकीची सुटका करण्याची मागणी करत आहेत. आफिया सिद्दीकीनं (Aafia Siddiqui)अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan)नजरकैदेत असताना अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, असं अमेरिकन अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आफिया सिद्दीकी सध्या टेक्सासमधील एफएमसी कार्सवेल जेलमध्ये बंद आहे. तिला 86 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे देखील या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. यादरम्यान 4 पैकी एका व्यक्तीची सुटका करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, टेक्सासमधील ज्यू धर्मीय स्थळावर या लोकांना ओलीस ठेवण्यात आलं आहे. Thane: अल्पवयीन मुलीचं अपहरण करून 2 महिने होता फरार, एका चुकीमुळे झाला गजाआड  त्याचवेळी, पाकिस्तानी शास्त्रज्ञ आफिया सिद्दीकीच्या भावाच्या वतीने हजर झालेल्या वकिलाने दावा केला आहे की, 4 लोकांना ओलीस ठेवणारी आफिया हा सिद्दिकीचा भाऊ नाही. वकीलाने यूएस मीडियाला असेही सांगितले आहे की, त्यांचा क्लायंट सतत यूएस एजन्सींना कॉल करत आहे आणि त्यांना आश्वासन देत आहे की तो ओलीस ठेवण्याच्या या घटनेत सहभागी नाही. तो म्हणतो की, तो त्याच्या बहिणीची शांततापूर्वक सुटका करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे. यासंदर्भात त्यांना वेळोवेळी माहिती देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यासोबतच राष्ट्रीय सुरक्षा दलाचे वरिष्ठ सदस्यही अमेरिकन एजन्सींच्या संपर्कात आहेत. U-19 World Cup: टीम इंडियाची विजयी सुरुवात, दक्षिण आफ्रिकेचा 45 धावांनी पराभव यादरम्यान कॉलीविलेच्या पोलिसांनी माहिती दिली की, ओलीस ठेवणाऱ्याने एका व्यक्तीला सोडलं आहे. त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. तो सुरक्षित आहे. दरम्यान अजूनही अन्य लोकं आतमध्ये आहेत. मात्र अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. त्याच वेळी, एफबीआय अधिकारी ओलीस ठेवणाऱ्याशी संपर्क साधण्यात गुंतले आहेत जेणेकरून ही परिस्थिती चर्चेद्वारे संपुष्टात आणता येईल. आफिया सिद्दीकी न्यूरोसायंटिस्ट आफिया सिद्दीकीने मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून न्यूरोसायन्समध्ये पीएचडी केली आहे. 2003 मध्ये जेव्हा दहशतवादी खालिद शेख मोहम्मदने FBI ला तिच्याबद्दलचे संकेत दिले तेव्हाच तिचं नाव दहशतवादी कारवायांमध्ये आलं होतं. यानंतर डॉ. आफियाला अफगाणिस्तानमधून अटक करण्यात आली. त्यानंतर तिनं बगराम तुरुंगात एफबीआय अधिकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तिला अमेरिकेत पाठवण्यात आलं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: America, Pakistan

    पुढील बातम्या