Home /News /sport /

U-19 World Cup: टीम इंडियाची विजयी सुरुवात, दक्षिण आफ्रिकेचा 45 धावांनी पराभव

U-19 World Cup: टीम इंडियाची विजयी सुरुवात, दक्षिण आफ्रिकेचा 45 धावांनी पराभव

India beat South Africa by 45 runs: 2022 च्या U-19 वर्ल्डकपची सुरुवात भारताने विजयाने केली आहे.

    नवी दिल्ली, 16 जानेवारी: 2022 च्या U-19 वर्ल्डकपची सुरुवात भारताने विजयाने केली आहे. गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियानं (Team India) दक्षिण आफ्रिकेचा 45 धावांनी पराभव केला. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना टीम इंडियानं 46.5 ओव्हरमध्ये 232 रन करत ऑलआऊट झाले होते. (India vs South Africa U-19 World Cup ) प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेची टीम 45.4 ओव्हरमध्ये 187 रनवर गारद झाली. कॅप्टन यश धुल आणि स्पिनर विकी ओस्तवाल हे टीम इंडियाच्या विजयाचे हिरो ठरले. धुलने 82 धावांची खेळी खेळली. त्याचबरोबर विकीने चांगली बॉलिंग करताना पाच विकेट्स घेतल्या. यासाठी त्याला प्लेअर ऑफ द म्हणून गौरवण्यात आले. 232 रन करुन टीम इंडिया ऑलआऊट टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. अवघ्या 11 धावांवर टीम इंडियानं सलामीवीर तंबूत परतले. यानंतर शेख रशीद आणि कॅप्टन यश धुल यांनी धुरा सांभाळत तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी रचली. रशीद 54 बॉलमध्ये 31 रन करुन आऊट झाला. त्यानंतर यशने निशांत सिंधू, राज बावा आणि कौशल तांबे यांच्यासोबत छोट्या पण महत्त्वाची भागीदारी सांभाळली आणि टीमची धावसंख्या 200 च्या पुढे नेली. मात्र कॅप्टन यशच्या रनआऊटनंतर टीमनं 46.5 ओव्हरमध्ये 232 रन केले. भारताकडून कॅप्टन यश धुलने सर्वाधिक 82 रन केल्या. त्याचवेळी निशांत सिंधू 27 रन, राज बावा 13 रन आणि कौशल तांबे 35 रन करू शकले. टीम इंडियाच्या सहा बॅट्समनना दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्यात अंगकृष्ण रघुवंशी (5), हरनूर सिंग (1), दिनेश बाना (7), विकी ओस्तवाल (9), राजवर्धन हंगरगेकर (0) आणि रवी कुमार (नाबाद 0) यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेकडून मॅथ्यू बोस्टने तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय अफिवे नियांडा आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी प्रत्येकी दोन- दोन विकेट्स घेतले. लियाम एल्डर आणि मिकी कोपलँडला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Cricket news, Sports

    पुढील बातम्या