मराठी बातम्या /बातम्या /विदेश /सेक्स न करताच गरोदर राहिली तरुणी, हे नेमकं कसं घडलं? वाचून तुम्हालाही बसेल धक्का

सेक्स न करताच गरोदर राहिली तरुणी, हे नेमकं कसं घडलं? वाचून तुम्हालाही बसेल धक्का

हॉस्पिटल मध्ये जाताना काही खास तयारी करावी लागते.

हॉस्पिटल मध्ये जाताना काही खास तयारी करावी लागते.

एक दिवस ऑफिसमध्ये काम करत असताना अचानक निकोलच्या छातीत जळजळ होऊ लागली आणि स्तन दुखल्यासारखे वाटू लागले. तेव्हा तिला तिच्या बॉसने तू प्रेग्नंट (pregnant) असू शकतेस असं सांगितलं.

    नवी दिल्ली 12 मार्च : सेक्स (sex) न करता एखादी महिला प्रेग्नंट (pregnant) राहिली असं सांगितल्यावर कोणालाही आश्चर्यच वाटेल. पण अशी घटना घडली आहे. यूकेमधील हॅम्पशायरमध्ये (Hampshire) राहणारी एक तरुणी सेक्स न करता प्रेग्नेंट राहिली. प्रेग्नेंट असल्याचं कळाल्यानंतर तिलादेखील आश्चर्याचा धक्का बसला होता. ब्रिटनमधील हॅम्पशायरमध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय निकोल मूरने (Nicole Moore) ती आठ वर्षांपूर्वी सेक्स न करता कशी प्रेग्नेंट राहिली होती याचा खुलासा सोशल मीडियावर केला आहे.

    निकोल मूर व्हजानिझमस (vaginismus) या योनीमार्गाच्या आजारानं ग्रस्त आहेत. अशा परिस्थितीत योनीमार्गाचे स्नायू खूपच कठीण होतात त्यामुळे निकोलला सेक्स करणं किंवा टॅम्पॉनचा (Tampon) वापर करणं अवघड जातं. अशा परिस्थितीत निकोलला ती प्रेग्नंट असल्याचं कळाल्यावर आश्चर्याचा मोठा धक्का बसला.

    डेली मेलशी बोलताना निकोलनं सांगितलं की, 'मला योनीमार्गात टॅम्पॉन घालण्यास अडथळा येत होता. त्यावेळी मला वाटलं की काहीतरी त्रास आहे. तेव्हा मी याबाबत डॉक्टरांना सांगितलं. पण डॉक्टरांनी सर्वकाही ठीक असल्याचं सांगितलं होतं.'

    निकोल 18 वर्षांची होती तेव्हा तिने बॉयफ्रेंडला डेट करायला सुरुवात केली होती. हे जोडपे कधीही सेक्स करु शकले नाही. निकोल सांगते की, 'मी याचे वर्णन असंच करु शकते की जेव्हा मी आणि माझा बॉयफ्रेंड सेक्स करायचो तेव्हा माझ्या योनीतील आजारामुळे त्याला खूप कठीणपणा जाणवायचा.जणू एखाद्या विटांच्या भिंतीला ठोकर देतोय असंच त्याला वाटायचं.' यामुळे चिंतेत असलेली निकोल डॉक्टरांकडे गेली त्यांनी तिची तपासणी केली. तिचा योनीमार्ग खूपच कठीण असल्याचं त्यांनी सांगितलं.

    एक दिवस ऑफिसमध्ये काम करत असताना अचानक निकोलच्या छातीत जळजळ होऊ लागली आणि स्तन दुखल्यासारखे वाटू लागले. तेव्हा तिला तिच्या बॉसने तू प्रेग्नंट असू शकतेस असं सांगितलं. तर त्यावर निकोल हसली आणि म्हणाली की मी अजूनही व्हर्जिन आहे.

    निकोलने सांगितलं की, 'सेक्स करायला त्रास होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यावेळी तिचा बॉयफ्रेंड इंटिमेट होण्यासाठी दुसऱ्या पद्धतीचा वापर करायचा.' डॉक्टरांनी सांगितलं होतं की, नैसर्गिक पद्धतीनं सेक्स न करता जरी शुक्राणू किंवा वीर्य कोणत्याही प्रकारे स्रीच्या योनीमध्ये गेले तरीही स्रीची गर्भधारणा होऊ शकते. पण हे अत्यंत दुर्मिळ घटनांमध्ये होते. त्यानंतर निकोल आणि तिच्या बॉयफ्रेंडने पेनिट्रेटिव्ह सेक्स न करता वीर्य योनीत पोहोचवण्यासाठी इतर पर्याय अवलंबले आणि ते फलितही झाले.

    निकोलला भिती वाटत होती की लैगिंक संबंध नसतानाही ती बाळाला जन्म कसा देईल आणि प्रेग्नेंसीबाबत ऐकल्यानंतर तिचा बॉयफ्रेंड तिच्यावर संशय घेईल. दरम्यान, चार महिन्याची प्रेग्नेंट असताना निकोलला व्हजायनिझमस आजाराविषयी कळाले आणि हळूहळू सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली. डॉक्टरांनी तिला सांगितलं की, 'जर योनीमार्गामध्ये शुक्राणू प्रवेश करत असेल तर सेक्स न करता प्रेग्नेंट राहण्याची शक्यता असते.'

    या आजाराविषयी माहिती मिळाल्यानंतर निकोल या आजाराच्या थेरेपिस्टकडे गेली. त्यांच्या मदतीने निकोल या आजारातून बाहेर येऊ शकली. काही महिन्यांच्या प्रेग्नेन्सीनंतर निकोल सेक्स करण्यास सक्षम झाली. निकोल म्हणाली की, 'डिलिव्हरी होताना तिला कसलाही त्रास झाला नाही.'

    निकोलची मुलगी टिल्ली आता आठ वर्षांची आहे. निकोल म्हणाली की, 'माझी मुलगी माझ्यासाठी एका चमत्कारासारखी आहे. काही लोकं मला अजूनही 'व्हर्जिन मॅरी' (Virgin Mary) म्हणून हाक मारतात हे ऐकल्यानंतर मला खूप हसू येतं.' दरम्यान, निकोलची सेक्स लाईफ आता नॉर्मल झाली आहे.

    First published:
    top videos

      Tags: Girl pregnant, Sex