जाहिरात
मराठी बातम्या / Viral / थेट छाव्यासोबत स्डुडिओमध्ये केलं वेडिंग फोटोशूट; गुंगीच औषध देऊन फोटोसेशनचा आरोप

थेट छाव्यासोबत स्डुडिओमध्ये केलं वेडिंग फोटोशूट; गुंगीच औषध देऊन फोटोसेशनचा आरोप

थेट छाव्यासोबत स्डुडिओमध्ये केलं वेडिंग फोटोशूट; गुंगीच औषध देऊन फोटोसेशनचा आरोप

एका जोडप्याने लग्नात सिंहाच्या छाव्यासोबत फोटोशूट केल्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. पण आता मात्र त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कराची, 15 मार्च : पाकिस्तानात लग्न समारंभात जंगली प्राणी आणि पक्षी ठेवण्याला परवानगी आहे. पण त्या प्राण्यांचा व्यावसायिक वापर करायला बंदी आहे. एका जोडप्याने लग्नात सिंहाच्या छाव्यासोबत फोटोशूट केल्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. पण आता मात्र त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. आजतक ने दिलेल्या वृत्तानुसार, लाहोरमधील स्टुडिओ अफजलने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर या लग्नाच्या फोटोशूटचे फोटो प्रसिद्ध केले होते. त्यात नवदाम्पत्याने एका सिंहाच्या छाव्यासोबत फोटो काढलेले दिसत आहे. या फोटोंची सोशल मीडियावर खूप चर्चाही झाली. पण या छाव्याला ड्रग देऊन बेशुद्ध करून हे फोटोशूट केल्याचा आरोप होऊ लागला आणि ही चर्चा अधिकच वाढत गेली. छाव्याला ड्रग दिल्याच्या चर्चेमुळे सोशल मीडियावर या जोडप्यावर प्रचंड टीका होत आहे. एरवी पाकिस्तानात हा गुन्हा ठरला नसता, पण प्रसिद्धी मिळवण्यासाठी वन्य प्राण्याचा वापर केला गेला म्हणून पंजाब प्रांतातील वनअधिकाऱ्यांनी नोटीस पाठवण्यासाठी या जोडप्याला शोधायला सुरुवात केली आहे. दरम्यान या स्टुडिओने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. या शूटिंगवेळी त्या छाव्याचा मालक उपस्थित होता आणि त्या छाव्याला कोणताही त्रास दिला गेलेला नाही किंवा त्याला ड्रग देण्यात आलेलं नाही असं स्टुडिओने स्पष्टीकरणात म्हटलं आहे. आपल्या म्हणण्याला पुरावा म्हणून त्या छाव्याचे शुटिंगदरम्यानचे दोन व्हिडीओही या स्टुडिओने शेअर केले आहेत.

(वाचा -  मुलाला बेदखल करत हत्तीच्या नावावर केली 5 कोटीची संपत्ती, अतूट नात्याची अनोखी कथा )

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानात ज्या प्राण्याचं अस्तित्व नाही आणि तो तिथला मूळचा प्राणी नाही अशा दुर्मिळ प्राण्यांचा वापर करण्यास कायद्याने बंदी आहे. काही अटी मान्य केल्यानंतर पाकिस्तानी नागरिक एखाद्या रानटी जनावराचं प्रजनन केंद्र चालवू शकतात.

जाहिरात

हौस म्हणून लोक अनेक गोष्टी करतात. पण पाकिस्तानातील या जोडप्याची हौस त्यांच्यावर कारवाई झाली, तर त्यांना प्रचंड महागात पडणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे असं काही करण्यापूर्वी अनेकदा विचार करायला हवा. प्रसिद्धी, लाइक्स सगळं काही मिळेल पण त्याचा विपरित परिणामही कदाचित भोगावा लागू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात