मराठी बातम्या /बातम्या /विदेश /अ‍ॅपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचा पहिला जॉब अ‍ॅप्लिकेशन होतोय व्हायरल; लवकरच करणार लिलाव

अ‍ॅपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचा पहिला जॉब अ‍ॅप्लिकेशन होतोय व्हायरल; लवकरच करणार लिलाव

अ‍ॅपलचे सहसंस्थापक स्टीव जॉब्स (Steve Jobs)  यांनी 1973 मध्ये पहिल्यांदा नोकरीसाठी अर्ज केला होता.

अ‍ॅपलचे सहसंस्थापक स्टीव जॉब्स (Steve Jobs) यांनी 1973 मध्ये पहिल्यांदा नोकरीसाठी अर्ज केला होता.

अ‍ॅपलचे सहसंस्थापक स्टीव जॉब्स (Steve Jobs) यांनी 1973 मध्ये पहिल्यांदा नोकरीसाठी अर्ज केला होता.

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : अ‍ॅपल कंपनीचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्ज (Apple co-founder Steve Jobs) सध्या चर्चेमध्ये आहेत. यामागचे कारण म्हणजे स्टीव्ह जॉब्ज यांच्या पहिल्या जॉब अ‍ॅप्लिकेशनचा लिलाव (job application auction) होणार आहे. स्टीव्ह जॉब्ज यांनी 1973 साली आपल्या हातानेच हे जॉब अ‍ॅप्लिकेशन लिहून पहिल्या नोकरीसाठी अर्ज केला होता. 2018 मध्ये या जॉब अ‍ॅप्लिकेशनच्या लिलावाद्वारे 1,75,000 डॉलर जमा करण्यात आले होते. सध्याच्या काळात भारतीय रुपयांनुसार याची किंमत तब्बल 1.27 कोटी एवढी होईल. चार्टरफील्ड वेबसाईट आता पुन्हा एकदा 24 फेब्रुवारी ते 24 मार्च 2021 या एका महिन्याच्या कालावधीत लिलावासाठी यादी जारी करेल.

चार्टर फील्ड्सच्या माध्यमातून लिलाव करण्यात येणाऱ्या या जॉब अ‍ॅप्लिकेशनमध्ये स्टीव्ह जॉब्ज यांनी रीड कॉलेजमधून इंग्रजी साहित्यांचा अभ्यास केला असल्याचे लिहिले आहे. या जॉब अ‍ॅप्लिकेशनमध्ये स्टीव्ह जॉब्ज यांनी आपली स्कील्स म्हणून कम्प्युटर आणि कॅलक्युलेटरचा उल्लेख केला आहे. या व्यतिरिक्त डिझाइन आणि टेक्नॉलॉजीचा देखील उल्लेख केला आहे. त्यांनी आपल्या स्पेशल स्किल म्हणून इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल टेक आणि डिझाइन इंजिनिअरमध्ये रस असल्याचे लिहिले आहे.

लिलावापूर्वी अ‍ॅप्लिकेशनबाबत काय माहिती दिली आहे?

चार्टरफील्ड्सच्या (Charterfields) वेबसाइटवर स्टीव्ह जॉब्ज यांच्या जॉब अ‍ॅप्लिकेशनबाबत असे लिहिले आहे की, '1973 मध्ये स्टीव्ह जॉब्ज यांनी नोकरीसाठी केलेल्या एका जॉब अ‍ॅप्लिकेशनचा लिलाव केला जात आहे. या जॉब अ‍ॅप्लिकेशनमध्ये स्टीव्ह जॉब्ज यांनी कम्प्युटर आणि कॅलक्युलेटरबाबत असलेल्या आपल्या अनुभवाविषयी लिहिले. त्यांनी हे सुद्धा लिहिले की, त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक आणि डिझाइन इंजिनिअर डिजिटलमध्ये विशेष कौशल्य आहे.'

यामध्ये असे सुद्धा लिहिले आहे की, 'हे जॉब अ‍ॅप्लिकेशन तेव्हाचे आहे जेव्हा स्टीव्ह जॉब्ज यांनी ओरेगॉनच्या पोर्टलँड स्थित रीड कॉलेजमधील आपले शिक्षण अर्धवट सोडले होते. एका वर्षानंतर अटारी येथे ते टेक्निशियन म्हणून रुजू झाले होते. जिथे त्यांनी स्टीव्ह वोझ्नियाक यांच्यासोबत काम केले. 1976 साली दोघांनी मिळून  अ‍ॅपल कपंनीची स्थापना केली होती.'

जॉब अ‍ॅप्लिकेशनची कशी आहे अवस्था?

या वेबसाइटने जॉब अ‍ॅप्लिकेशनच्या लिलावापूर्वी असे देखील म्हटले की, 'थोडेसे संकुचन आणि रंग कमी झाल्याचे सोडले तर हे जॉब अ‍ॅप्लिकेशन चांगल्या अवस्थेत आहे. ते कुठेही फाटलेले नाही. या जॉब अ‍ॅप्लिकेशनसोबत ऑथेन्टिसिटी लेटर आणि सर्टिफिकेट देखील आहे. 2018च्या आधी एका लिलावामध्ये हे अ‍ॅप्लिकेशन 1,75,000 डॉलरमध्ये विकण्यात आले होते.'

एका पानाच्या या जॉब अ‍ॅप्लिकेशनमध्ये स्टीव्ह जॉब्ज यांनी कोणत्या पोस्टसाठी आणि कोणत्या कंपनीला नोकरीसाठी अर्ज केला होता ही माहिती दिलेली नाही. पण या अ‍ॅप्लिकेशनवरुन हे समजते की त्यांनी कम्प्युटिंग कंपनीसाठी अर्ज केला होता. या अ‍ॅप्लिकेशनला ऑनलाइन लिलावासाठी महिनाभर ठेवले जाणार आहे.

First published:
top videos

    Tags: Apple, Business News