Home /News /videsh /

हद्दच झाली! चिमुकल्यांच्या कपड्यांवर भारतविरोधी मेसेज; चिनी कंपनीचं संतापजनक कृत्य

हद्दच झाली! चिमुकल्यांच्या कपड्यांवर भारतविरोधी मेसेज; चिनी कंपनीचं संतापजनक कृत्य

एका आईला आपल्या मुलाच्या कपड्यांवरील हा मजकूर वाचून धक्काच बसला.

    बीजिंग, 24 सप्टेंबर : चीन (China) तसा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात असतोच. चिनी कंपन्या, चिनी माल तसा चर्चेत असतो. पण आता मात्र अशाच एका चिनी कंपनीने (China clothing brand) हद्दच केली आहे. चीनमधील प्रसिद्ध क्लॉदिंग ब्रँड JNBY (Chinese clothing brand JNBY) ने लहान मुलांच्या कपड्यांवर भारतविरोधी मेसेज (Anti india massage on chinese clothing brand) छापले आहेत. एका आईने सोशल मीडियावर याबाबत तक्रार केली आणि या ब्रांडवर बहिष्कार घालण्याची मागणी केली. सर्वात प्रभावशाली डिझाइनसर ब्रँड फॅशन हाऊस असल्याचा दावा करणारी चीनच्या हांग्जो शहरातील ही कंपनी. या कंपनीचे कपडे एका महिलेने सोशल मीडियावर पोस्ट केले. जे तिच्या लहान मुलासाठी खरेदी करण्यात आले होते. लहान मुलांच्या कपड्यांवरील मजकूर पाहून महिलेला धक्काच बसला. क्लॉदिंग ब्रांड JNBY च्या कपड्यांवर वेलकम टू हेल (Welcome to hell) आणि लेट मी टच यू (Let me touch you) असे शब्द प्रिंट केले होते. हे वाचा - व्याज नाही दिलं म्हणून तालिबानी शिक्षा; विजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाण हाँगकाँगमधील साऊथ इंडिया मॉर्निंग पोस्टने महिलेच्या हवाल्याने सांगितलं की, वेलकम टू हेल. क्षमा करा? तुम्ही कुणाचं स्वागत करत आहात. हे फोटो यातना देणारे आहेत आणि चार वर्षांचं मूल हे कपडे घालणार आहे. याचा विचार करूनच मी हैराण झाले  आहे. महिलेने चिनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानुसार, तिच्या कुटुंबाने तिच्या चार वर्षांच्या मुलासाठी एक शर्ट खरेदी केलं. मुलाच्या आजी-आजोबांनी हे शर्ट खरेदी केलं होतं, ज्यांना इंग्रजी येत नाही. महिलेची पोस्ट व्हायरल होताच एका युझरने भारतविरोधी प्रोडक्टही शेअर केले. ज्यामध्ये संपूर्ण जग भारताने भरलेलं आहे. मी ही बंदूक घेऊन त्यांच्यावर गोळ्या चालवेन. असं यावर म्हटलं आहे. हे वाचा - गोरिल्लाचं कृत्य पाहून पर्यटक शरमले; आई-वडिलांनी मुलांसह Zoo मधून ठोकली धूम सरकारी मीडियानेही यावर टीका केली आहे. सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने कपड्यांवरील हे प्रिंट्स अयोग्य आणि भयानक असल्याचं म्हटलं आहे. पण या रिपोर्टमध्ये भारतविरोधी फोटोंबाबत काहीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. यानंतर कंपनीने माफी मागितली आहे आणि असे सर्व कपडे मार्केटमधून परत मागवले आहेत. कंपनीने आपलं लाइफस्टाइल शेअरिंग अॅप  Xiaohongshu  वर माफी मागितल्याचंही ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे. डिझाइनमुळे ग्राहकांना झालेल्या समस्येबाबत मी माफी मागत असल्याचं म्हटलं. पण असे अयोग्य शब्द आणि फोटो कपड्यांवर कसे छापले याबाबत स्पष्टीकरण दिलेलं नाही.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Brand, China, Lifestyle, World news

    पुढील बातम्या