जाहिरात
मराठी बातम्या / Viral / व्याज नाही दिलं म्हणून तालिबानी शिक्षा; विजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाण, Shocking Video

व्याज नाही दिलं म्हणून तालिबानी शिक्षा; विजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाण, Shocking Video

व्याज नाही दिलं म्हणून तालिबानी शिक्षा; विजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाण, Shocking Video

या घटनेचा एक VIDEO समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सावकार 50 हजार रुपयांच्या कर्जासाठी 30 हजार रुपये आकारत होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

गिरिडीह, 24 सप्टेंबर : झारखंडमधील ( Jharkhand News) गिरिडीग जिल्ह्यात मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. गिरिडीह जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा विचार न करता एका व्यक्तीला तालिबानी शिक्षा देण्यात आली. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Video Viral On Social Media) होत आहे. गिरिडीह जिल्ह्यातील राजधनवार प्रखंडमधील चट्टी गावात एका सावकाराकडून कर्जाची रक्कम घेतल्यानंतर त्याचं व्याज दिलं नाही म्हणून मारहाण ( beaten by Moneylender) करण्यात आली. सावकाराने या व्यक्तीला आपल्या घरासमोरील विजेच्या खांबाला बांधून त्याला मारहाण केली. यावेळी हजर असलेले लोक गपचूप हा सर्व धक्कादायक प्रकार पाहत उभे होते. कोणीच त्या व्यक्तीच्या मदतीसाठी गेलं नाही. सांगितलं जात आहे की, धनवार प्रखंडमधील चट्टी निवासी विनोद नायक यांनी शहरातील सावकार उमेश नायक यांच्याकडून व्याजावर 50 हजार रुपये घेतले होते. (Taliban punishment for not paying interest beaten by Moneylender Shocking Video) हे ही वाचा- गोरिल्लाचं कृत्य पाहून पर्यटक शरमले; आई-वडिलांनी मुलांसह Zoo मधून ठोकली धूम कर्ज घेतल्याच्या 2 वर्षांनंतर आरोपी सावकार उमेशने विनोदकडून 30 हजार रुपये व्याज मागितलं. यावेळी पीडित म्हणाला की, सध्या मूळ रक्कम 50 हजार देऊ शकतो, 30 हजार रुपये देऊ शकत नाही. यानंतर सावकार उमेश नायकने आपल्या अन्य नातेवाईकांसह मिळून विनोद नायक याला घराच्या बाहेरील विजेच्या खांबाला बांधून त्याला जबर मारहाण केली. अवघ्या काही हजारांसाठी या व्यक्तीला अशा प्रकारची शिक्षा देण्यात आली.धक्कादायक बाब म्हणजे 50 हजार रुपयांसाठी तब्बल 30 हजारांचं व्याज सावकाराकडून मागण्याच येत होतं. या प्रकरणात पीडित व्यक्तीच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचं सांगण्यात आलं आहे.  

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात