मराठी बातम्या /बातम्या /Viral /

गोरिल्लाचं कृत्य पाहून पर्यटक शरमले; आई-वडिलांनी मुलांचे डोळे बंद करून Zoo मधून ठोकली धूम

गोरिल्लाचं कृत्य पाहून पर्यटक शरमले; आई-वडिलांनी मुलांचे डोळे बंद करून Zoo मधून ठोकली धूम

या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    अमेरिका, 24 सप्टेंबर : आई-वडिलांसह झूमध्ये (Zoo) फिरायला जाणं कोणत्या मुलांना आवडत नाही. सुट्टीच्या दिवसात आई-वडील मुलांना झू किंवा कोणत्याही नेचर पार्कमध्ये आवर्जुन घेऊन जातात. यामुळे मुलं निसर्गाच्या अधिक जवळ येतात. यामुळे मुलांचं लग्न टीव्ही आणि सोशल मीडियावरुन हटवणं शक्य होतं. मात्र जर झूमध्ये जर काही विचित्र (Weird Scene at Zoo) घटना घडली तर आई-वडीलही हैराण होतात. आणि तेथूनही मुलांना पळवून आणावं लागतं. अमेरिकेतून असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. अमेरिकेतील (USA) न्यूयॉर्क (New York) शहरात 23 सप्टेंबर रोजी अशी घटना घडली. तसं पाहत हे विनोदीच असला तरी शरम आणणारादेखील आहे. अमेरिकेतील ब्रॉन्क्स झूमध्ये (Children in Bronx Zoo) अनेक आई-वडील आपल्या मुलांना घेऊन फिरायला आले होते. इतर प्राण्यांना पाहता पाहता जेव्हा ते गोरिल्लाला पाहायला आले, तेव्हा (Gorillas in Zoo)  सर्वजण खूप मजा करीत होते. मात्र अचानक नर और मादा गोरिल्ला संबंध (Gorilla intimate act in USA zoo) बनवू लागले. दोघांची कृत्य पाहून तेथे उपस्थित असलेले आई-वडील शरमले आणि आपल्या मुलांचे डोळे बंद करून त्यांना तेथून घेऊन गेले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये कुटुंबीय त्रस्त झाल्याचं दिसून येत आहे.  आणि आपल्या मुलांना ते तेथून हटवत असल्याचं दिसत आहे. न्यूयॉर्क पोस्टशी बोलताना एक पालकाने सांगितलं की, मी गोरिल्लाचं कृत्य पाहून हैराण झालो. जरी ते नैसर्गिक कृत्य असलं तरी ते हैराण करणारं होतं. गोरिल्लाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेकजण गोरिल्लाच्या समर्थनार्थ देखील प्रतिक्रिया देत आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: America, Funny video, Sexual relationship, Viral video., Zoo

    पुढील बातम्या