जाहिरात
मराठी बातम्या / देश / विकास दुबेच्या एन्काऊंटरवर काँग्रेस नेत्यांनी साधला निशाणा; प्रियांका गांधींनी उपस्थित केला सवाल

विकास दुबेच्या एन्काऊंटरवर काँग्रेस नेत्यांनी साधला निशाणा; प्रियांका गांधींनी उपस्थित केला सवाल

विकास दुबेच्या एन्काऊंटरवर काँग्रेस नेत्यांनी साधला निशाणा; प्रियांका गांधींनी उपस्थित केला सवाल

पोलिसांची निघृणपणे हत्या केलेल्या गँगस्टर विकास दुबे याचं आज एन्काऊंटर करण्यात आलं

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 10 जुलै : उत्तर प्रदेशातील कानपूरच्या बिकरू गावात 8 पोलिसांना ठार मारल्याचा आरोप असलेल्या गँगस्टर विकास दुबे याच्या एन्काऊन्टरबाबत नाव न घेता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. राहुल यांनी एक शेरमध्ये बदल करीत म्हटले आहे की, विकासके मर जाने के बाद ना जाने कितने सवालों की इज्जत बच गई. विकास दुबे याच्या चकमकीवर राहुल यांनी लिहिले- अनेक उत्तरांपेक्षाही चांगली आहे शांतता त्याची.कानपूरच्या बिकरु परिसरातील कुख्यात गुन्हेगार आणि आठ पोलीस खून प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे हा शुक्रवारी सकाळी कानपूरच्या भौती भागात पोलिसांच्या चकमकीत ठार झाल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्जैनहून कानपूरला आणत असताना रस्त्यावर झालेल्या अपघातात पोलिसांचे वाहन पलटले, त्यानंतर दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलीस वाहन उलटल्याने पोलीस निरीक्षकासह चार पोलिसही जखमी झाले, त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

जाहिरात

प्रियांकानेही प्रश्न उपस्थित केले या चकमकीवर कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही ट्विट केले आहे. राज्य सरकार आणि भाजपवर प्रश्नचिन्ह ठेवत प्रियंका म्हणाली- ‘दोषी संपला आहे, गुन्ह्याचे आणि त्याचे संरक्षण करणाऱ्या लोकांचे काय?’ हे वाचा- ‘विकास दुबे हा अट्टल गुन्हेगार होताच मात्र त्याच्यापेक्षाही शातिर निघाले पोलिस’ एन्काऊंटरवर पोलिसांनी काय म्हटले? त्याचवेळी कानपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिनेशकुमार पी यांनी सांगितले की, सकाळी हा अपघात झाला. ते म्हणाले ‘जोरदार पाऊस पडत होता. पोलिसांनी दुचाकीला धडक दिल्याने गाडी पलटी झाली आणि गाडीतील पोलीस जखमी झाले. त्याच संधीचा फायदा घेत दुबे याने पोलीस कर्मचाऱ्याची पिस्तूल हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला स्वाधीस होण्यास पोलिसांनी सांगितले. मात्र विकासने गोळी चालवल्यानंतर त्याच्यावर गोळ्या झाडल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात