विकास दुबेच्या एनकाउंटरनंतर ट्विटरवर रोहित शेट्टी ट्रेंड, वाचा काय आहे कारण

विकास दुबेच्या एनकाउंटरनंतर ट्विटरवर रोहित शेट्टी ट्रेंड, वाचा काय आहे कारण

कुख्यात गुंड विकास दुबेला उत्तर प्रदेश पोलिसांनी ठार केल्यानंतर सोशल मीडियावर फिल्ममेकर रोहित शेट्टीचे (Rohit Shetty) नाव चर्चेत आले आहे. यामागचे कारणही भन्नाट आहे

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : कानपूर (Kanpur)च्या बिकरू गावामध्ये सीओसह 8 पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेचा (Vikas Dubey) एनकाऊंटर करण्यात आला आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी तात्काळ कारवाई करून विकास दुबेच्या मुस्क्या आवळल्या होत्या. त्यानंतर संध्याकाळी चौकशी करण्यात आली आणि कानपूर पोलिसांच्या हवाली करण्यासाठी त्याला उत्तर प्रदेशात आणण्यात येत असताना पोलिसांच्या ताफ्यामधील गाडीला अपघात झाला. या अपघातचा फायदा घेऊन कारमध्ये बसलेल्या विकास दुबेने पोलिसांची बंदुक घेऊन फरार होण्याचा प्रयत्न केला. दुबेची शोधमोहीम सुरू झाली असताना त्यानं गोळीबार सुरू केला. पोलिसांनी सरेंडर करण्याचा सूचना देऊनही त्याचा गोळीबार सुरू होता. या गोळीबाराला पोलिसांकडून प्रत्युत्तर देत असताना विकास दुबे चकमकीत ठार झाला आहे.

(हे वाचा-सुशांतचं शेवटचं गाणं केवळ 11 लोकांनी पाहिलं? युट्यूबवरील VIEWS अचानक गायब)

दरम्यान या घटनेनंतर सोशल मीडियावर फिल्ममेकर रोहित शेट्टीचे (Rohit Shetty) नाव चर्चेत आले आहे. कारण असे की, रोहितच्या 'कॉप युनिव्हर्स'मधील अनेक फिल्म्स हिट आहेत. त्याच्या चित्रपटातील पोलीस, गुंड, गाड्यांचे अपघात अशी बहुंताश दृश्य असतात. त्यामुळे आज घडलेला घटनाक्रम रोहित शेट्टीच्या चित्रपटांशी मिळता जुळता असल्याचे ट्वीट व्हायरल होत आहेत. काही युजर्सनी असे म्हटले आहे की, रोहीतला आता 'सूर्यवंशी 2' साठी तयार कहाणी मिळाली. आजच्या एनकाऊंटरनंतर एका युजरने अशी कमेंट केली आहे की कदाचित युपी पोलिसांनी 'सिंघम रिटर्न' पाहिला होता.

रोहित शेट्टीचा 'कॉप यु्निव्हर्स'मधील सूर्यवंशी हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 10, 2020, 3:43 PM IST

ताज्या बातम्या