वॉशिंग्टन, 5 जानेवारी : सध्या पैसा कोणाला नको आहे. अशात सगळेच जण कमी वेळेत पैसे कमावण्याची (earning money) संधी शोधत असतात. यासाठी नवनवीन बिझनेस आयडिया (business idea) शोधण्याचा प्रयत्न सुरुच असतो. पण कधीकधी या आयडिया तुमच्या जीवावर बेतू शकतात. असाच काहीसा प्रकार अमेरिकेतील स्टेफनी मॅटो (Stephanie Matto) या टीव्ही कलाकाराच्या बाबतीत घडला आहे. नवभारत टाइम्स ने याबाबत वृत्त दिलयं. काचेच्या बाटलीत बंदिस्त केलेले फार्ट्स (Farts) विकून आठवड्याला 37 लाख रुपये कमावणारी स्टेफनी मॅटो आजारी पडली असून तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावं लागलं होतं. तिने सांगितले की, ‘मला वाटले की हृदयविकाराचा झटका (heart attack) आला आहे आणि ही माझी शेवटची वेळ आहे.’ मात्र, ती फार्ट्स विकण्याचे काम जास्त प्रमाणात करू लागली होती. त्यासाठी ती दररोज 3 प्रोटीन शेक आणि एक वाटी ब्लॅक बीन सूप घ्यायची. छातीत दुखू लागल्यानंतर तिने आता हा व्यवसाय सोडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. वाचा : Yuck काहीही! या बाटलीतून तरुणी विकते असं काही की वाचूनच उलटी येईल स्टेफनी ही एक रिअॅलिटी टीव्ही स्टार आहे. तिने 90 डे फियान्समध्ये (90 Day Fiance ) काम केलयं. तिच्या छातीत दुखू लागल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये (hospital) अॅडमिट करण्यात आले होते. तिच्यात हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं दिसत होती. रक्तासह विविध चाचण्यांनंतर शरीरात निर्माण होणाऱ्या गॅसमुळे तिच्या छातीत दुखत असल्याचे तिला सांगण्यात आले. अमेरिकेतील कनेक्टिकट येथे राहणाऱ्या स्टेफनीने हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिच्या फार्ट्स विकण्याच्या व्यवसायाबाबत डॉक्टरांना सांगितले नव्हते. डॉक्टरांनी तिला आहार बदलण्याचा सल्ला दिला, तसेच शरीरातील गॅसची समस्या दूर होण्यासाठी औषध दिले. यामुळे तिच्यावर व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. स्टेफनीने यापूर्वी खुलासा केला होता की, ‘अनेक वर्षांपासून मला महिला आणि पुरुषांकडून मेसेज येतात. मी परिधान केलेले कपडे, आंघोळीचे पाणी इत्यादीची खरेदी करण्याची इच्छा त्या मेसेजमध्ये ते व्यक्त करतात. मला वाटले की फार्ट्स विकणे मजेदार व्यवसाय आहे.’ वाचा : या महिलेच्या ठुसकीला मिळते मोठी किंमत! फक्त पादूनच कमवते लाखो रुपये आठवड्याला कमवत होती 37 लाख स्टेफनी दर आठवड्याला फार्ट्स विकून 37 लाख रुपये कमवत होती. दर आठवड्याला पन्नास बरण्या फार्ट्स भरून ती विकत होती. या एका बरणीची किंमत 1000 डॉलर्सच्या जवळपास होती. सोशल मीडियावर ती तिच्या 2 लाख 60 हजार फॉलोअर्सना फार्ट्स विकायची. मात्र, आजारपणात तिला श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला. तिने श्वास घेतला की हृदयाभोवती वेदना होत होत्या. त्यामुळे तिने हा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पैसे कमविण्यासाठी असा अजब व्यवसाय करणे अमेरिकेतील एका टीव्ही स्टारला चांगलेच महागात पडले आहे. वेळीच खबरदारी घेतल्यामुळे हा व्यवसाय तिच्या जीवावर बेतता बेतता राहिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.