वॉशिंग्टन, 30 मार्च : आपल्यासमोर कुणी मोठ्याने ठुसकी (Farting) सोडली की आपल्याला हसू आवरत नाही. कदाचित तुमच्यासोबतसुद्धा असं कधीतरी घडलेलं असू शकतो. पादणं ही तशी नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया. पोटात अतिरिक्त गॅस झाला की तो फार्टच्या (Fart) रूपाने बाहेर पडतो आणि त्यावेळी पोट हलकं झाल्यासारखंसुद्धा वाटतं. पण तरी सार्वजनिक ठिकाणी किंवा आपण कुणासोबत तरी असतो तेव्हा अचानकपण फार्ट आल्यास लाजच वाटते. कुणासमोर डोळे वर करायचीसुद्धा हिंमत होत नाही. आता फार्ट कंट्रोल होत नाही असं वाटलं की बहुतेक जण काही तरी बहाणा करून दूर जाऊन एकांतात पादून घेतात. पण तुम्हाला ज्या गोष्टीची लाज वाटते तिच गोष्ट खुलेआम, बिनधास्तपणे करत एक महिला लाखो रुपये कमवते.
पादणं हे तुमच्यासाठी विचित्र असू शकतं पण या महिलेचं कामच ते आहे. ही महिला पादण्यात एक्सपर्ट आहे आणि त्यामार्फत ती महिन्याला लाखो रुपये कमवते. अमेरिकेच्या साऊथ कॅरोलिनात राहणारी 48 वर्षांची एम्मा मार्टिन. 1999 सालापासून ती आपल्या फार्टचा व्हिडीओ तयार करते आणि ज्यांना हा व्हिडीओ पाहायचा आहे, त्यांच्याकडून ती पैसे घेते.
हे वाचा - 30 वर्षांनी उघडलं महिलेचं तोंड; भारतीय डॉक्टरांनी केली कमाल
एका व्हिडीओसाठी ती सध्या 4.99 डॉलर्स म्हणजे 366 रुपये आकारते. आता तुम्ही म्हणाल की कोणाला पादण्याचे व्हिडीओ पाहण्याची हौस असेल. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल अनेकांना या महिलेचा फार्ट व्हिडीओ आवडतात. लोक पैसे देऊन तिचे हे व्हिडीओ पाहतात. OnlyFans website वर आपल्या फार्ट व्हिडीओची विक्री करून ती महिन्याला 4200 डॉलर म्हणजे तब्बल 3 लाख रुपये कमवते.
एम्मा आपल्या आहाराची विशेष काळजी घेते. इंडिया टाइम्सच्या रिपोर्टनुसार एम्माने सांगितलं मी खूप सलाड खाते. अॅवोकॅडो आणि मेक्सिन पदार्थ जास्तीत जास्त खाते.
हे वाचा - वजन वाढल्याने मांजरालाही आलं टेन्शन; एक्सरसाइज करतानाचा VIDEO VIRAL
एम्माला दोन मुलंसुद्धा आहेत. तिच्या नवऱ्याला तिच्या या फार्ट व्हिडीओबाबत माहिती आहे. पण जेव्हा तिच्या आजूबाजूला कोणी नसतं किंवा घरात कुणी नसतं तेव्हा ती आपले फार्ट व्हिडीओ रेकॉर्ड करते. कोरोना काळात तर तिने लाइव्ह व्हिडीओजसुद्धा पोस्ट केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.