Home /News /coronavirus-latest-news /

Corona Vaccination: 1 मेपासून 18+ सगळ्यांना मिळणार लस, तत्पूर्वी केंद्राच्या राज्यांना महत्त्वाच्या सूचना

Corona Vaccination: 1 मेपासून 18+ सगळ्यांना मिळणार लस, तत्पूर्वी केंद्राच्या राज्यांना महत्त्वाच्या सूचना

कसं शोधाल व्हॅक्सीनेशन सेंटर ?

कसं शोधाल व्हॅक्सीनेशन सेंटर ?

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला (Third Phase of Vaccination) सुरुवात होण्याआधी अधिकाधिक खासगी सेंटर्सचं रजिस्ट्रेशन करुन घेण्याचा सल्ला केंद्रानं दिला आहे. 18-45 वयोगटादरम्यानच्या लोकांच्या लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणीला (Online Registration for Vaccination) प्राधान्य द्या, असंही केंद्रानं म्हटलं आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली 25 एप्रिल : देशात 1 मेपासून लसीकरणाच्या (Corona Vaccination) तिसऱ्या आणि मोठ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यामध्ये 18 वर्षावरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर लसीकरणाला सुरुवात होण्याआधी केंद्रानं राज्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होण्याआधी अधिकाधिक खासगी सेंटर्सचं रजिस्ट्रेशन करुन घेण्याचा सल्ला केंद्रानं दिला आहे. यासोबतच लसीकरण केंद्रावर गर्दी टाळण्यास आणि योग्य व्यवस्थेबाबतही केंद्रानं सल्ला दिला आहे. केंद्रानं या गोष्टीवर अधिक जोर दिला आहे, की या वयोगटातील लोकांचं लसीकरण केवळ ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या माध्यमातूनच करण्यात यावं. आरोग्य मंत्रालयानं सल्ला दिला आहे, की 1 मेपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी (Third Phase of Vaccination) राज्य सरकारांनी अधिकाधिक खासगी लसीकरण केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे अधिक युवकांना कमीत कमी वेळात लस देणं शक्य होईल. 'कोरोनामुळे आईचं निधन, बहिणीसाठी प्रार्थना करा' भारतीय क्रिकेटपटूचं आवाहन मंत्रालयानं म्हटलं, की कोविन (CoWin) पोर्टलच्या माध्यमातून लसीकरण केंद्र, लस घेतलेल्या लोकांची संख्या आणि नवीन रजिस्ट्रेशनवर नजर ठेवा. राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना असं सांगितलं गेलं आहे, की 18-45 वयोगटादरम्यानच्या लोकांच्या लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणीला प्राधान्य द्या. आधीप्रमाणंच आतादेखील लसीकरणासाठी आधार, मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसनही मान्य केलं जाईल. याआधी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि कोरोनासोबत लढण्यासाठी बनवण्यात आलेल्या उच्च अधिकार असलेल्या समूहाचे अध्यक्ष आर एस शर्मा यांनी शनिवारी बैठक घेतली. या बैठकीत 1 मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. सोबतच लसीची उपलब्धता आणि त्याच्या वाहतुकीबाबतही चर्चा झाली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Central government, Corona vaccination, Corona vaccine

    पुढील बातम्या