मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अमेरिकेत कोरोना मृतांचा आकडा 7 लाखांच्यावर, ब्राझील 6 लाखांच्या आसपास; काय आहे भारतातील स्थिती?

अमेरिकेत कोरोना मृतांचा आकडा 7 लाखांच्यावर, ब्राझील 6 लाखांच्या आसपास; काय आहे भारतातील स्थिती?

अमेरिकेत (United States of America) कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) होणाऱ्या मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

अमेरिकेत (United States of America) कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) होणाऱ्या मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

अमेरिकेत (United States of America) कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) होणाऱ्या मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

न्यूयॉर्क, 02 ऑक्टोबर: अमेरिकेत (United States of America) कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) होणाऱ्या मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अमेरिकेत कोरोना (US Corona Virus)व्हायरसमुळे होणाऱ्या मृतांचा आकडा 7 लाख 18 हजार 984 झाला आहे. एका दिवसात 1821 लोकांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ माजली आहे.

अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. मृतांची संख्या बोस्टनच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.

कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट

देशभरात कोविडमधून रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला ही संख्या 93 हजार इतकी होती. जी आता 75 हजारवर पोहोचली आहे. नवीन प्रकरणांमध्येही दररोज घट होताना दिसत आहे.

हेही वाचा- IPL 2021: अंपायरच्या निर्णयाचा पंजाबला झाला मोठा फायदा, KKR ठरली दुर्दैवी

AFP या वृत्तसंस्थेनं जॉन्स हॉपकिन्सच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, अमेरिकेत आतापर्यंत 7 लाखांहून अधिक कोविड मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत अमेरिकेत कोरोना व्हायरस संसर्गाची एकूण संख्या 4 कोटी 44 लाख 43 हजार 405 वर पोहोचली आहे. त्यापैकी 1 लाख 20 हजार 876 नवीन प्रकरणे आहेत. कोविडमुळे मृत्यूच्या बाबतीत ब्राझील जगभरात दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे आतापर्यंत कोविडमुळे एकूण 5 लाख 97 हजार 292 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोविडमुळे आतापर्यंत भारतात 4 लाख 48 हजार 605 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा- मुंबईतही चार दिवसात उघडणार धार्मिक स्थळं, पण जाणून घ्या नियमावली

Worldometers ब्राझीलमध्ये आतापर्यंत संसर्गाची एकूण 2 कोटी 14 लाख 45 हजार 651 प्रकरणे नोंदली गेली आहेत. तर भारतात संक्रमित रुग्णांची संख्या अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोविड संसर्गाची 3 कोटी 37 लाख 89 हजार 398 प्रकरणे आहेत. कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये मेक्सिको चौथ्या क्रमांकावर आहे (एकूण मृत्यू - 2,77,505) आणि पाचव्या क्रमांकावर रशिया आहे (एकूण मृत्यू - 2,08,142).

लसीकरण खूप महत्वाचं

अमेरिकेचे संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ.अँथनी फौसी (Dr. Anthony Fauci) यांनी शुक्रवारी इशारा दिला की, काही लोकांना उत्साहजनक आकडे दिसत आहेत. मात्र याचा अर्थ असा नाही की लस घेऊ नये. कोरोनाचा ग्राफ उतरत चालला आहे. ही एक चांगली बातमी आहे. मात्र लसीकरण करणं हे महत्त्वाचं आहे. सर्वांनी लस घेतली पाहिजे.

First published:

Tags: America, Coronavirus, Coronavirus cases, USA