मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईतही उघडणार धार्मिक स्थळं, 7 ऑक्टोबरपासून अशी असेल पालिकेची नियमावली

मुंबईतही उघडणार धार्मिक स्थळं, 7 ऑक्टोबरपासून अशी असेल पालिकेची नियमावली

मुंबईतही (Mumbai Corona Virus) कोरोना नियंत्रणात आला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्यानं मुंबईही हळूहळू अनलॉक (Unlock) होताना दिसत आहे.

मुंबईतही (Mumbai Corona Virus) कोरोना नियंत्रणात आला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्यानं मुंबईही हळूहळू अनलॉक (Unlock) होताना दिसत आहे.

मुंबईतही (Mumbai Corona Virus) कोरोना नियंत्रणात आला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्यानं मुंबईही हळूहळू अनलॉक (Unlock) होताना दिसत आहे.

मुंबई, 02 ऑक्टोबर: राज्यात कोरोनाची (Corona Virus) संख्या आता आटोक्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होताना दिसत आहे. त्यातच मुंबईतही (Mumbai Corona Virus) कोरोना नियंत्रणात आला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्यानं मुंबईही हळूहळू अनलॉक (Unlock) होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी घटस्थापनेच्या मुहुर्तावर म्हणजेच येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मीय धार्मिकस्थळं खुली करणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आता मुंबई महापालिका (Bombay Municipal Corporation) क्षेत्रातील ही धार्मिक स्थळं एकूण मर्यादेच्या 50 टक्के क्षमतेनं उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्य सरकारनं जारी केलेल्या कोरोना नियमांचं पालन करुन मुंबईतील धार्मिळ स्थळं उघडण्यात येतील. कोरोना प्रतिबंधक सर्व नियम काटेकोरपणे पाळण करण्याच्या अटीवर भाविकांसाठी पुन्हा एकदा धार्मिकस्थळं खुली करण्यात येणारेत.

हेही वाचा- चीन सीमेवरील तणावादरम्यान भारतानं सुरू केलं 5 महत्त्वाच्या रस्त्यांचं काम, असा होणार फायदा

काय आहे मुंबई पालिकेची नियमावली

मुंबई पालिका क्षेत्रांतील सर्व धार्मिक स्थळांमध्ये उपस्थितांची संख्या ही त्या धार्मिक स्थळाच्या क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत मर्यादित असेल.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं संपूर्ण पालन करणं आवश्यक असणार आहे.

सरकारनं वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करणं अनिवार्य असेल.

ब्रेक द चेन अंतर्गत धार्मिकस्थळं खुली करण्याकरिता सरकारकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना पालिका क्षेत्रांतही पुढील आदेशांपर्यंत जशाच्या तशा लागू असणार आहेत, असं मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा- तेजस ठाकरेंचं नवं संशोधन, मुंबईतल्या विहिरीत आढळली अंध ईलची नवी प्रजाती

 धार्मिक स्थळांमध्ये गेल्यानंतर वरीलपैकी कोणत्याही आदेशांची आणि नियमांची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीनं टाळाटाळ केली तर त्या व्यक्तीवर कडक कारवाई होणार असल्याचंही इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं आहे.

कोणत्याही व्यक्तीनं सरकारच्या नियमांचं पालन करण्यास टाळाटाळ किंवा विरोध केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 मधील कलम 51 ते 60 आणि भारतीय दंड संहिता, 1860 मधील कलम 188 आणि लागू असणाऱ्या इतर कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल असंही पालिकेनं स्पष्ट केलं आहे.

First published:

Tags: BMC, Mumbai muncipal corporation