टेक्सास, 07 मे : अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबाराची घटना घडलीय. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला असून यात लहान मुलांचाही समावेश आहे. तर 7 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. संशयित हल्लेखोरही पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला असल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलंय. गोळीबारावेळचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये रक्ताच्या थारोळ्यात काही लोक जमिनीवर पडल्याचं दिसतंय. यातील व्हिडीओमध्ये हल्लेखोरही जमिनीवर पडलेला दिसतो. त्याच्या मृतदेहाजवळ बंदूकसुद्धा आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, मी शॉपिंग करत होतो. मी हेडफोन लावले होते आणि अचानक गोळ्यांचा आवाज यायला लागला. मी लपून बसलो. पोलिसांनी आम्हाला मॉलच्या बाहेर जायला सांगितलं तेव्हा अनेक मृतदेह पाहिले. मी इतकीच प्रार्थना करत होतो की यात मुले नसावीत पण दुर्दैवाने मुलांचे काही मृतदेह दिसले. मोचा चक्रीवादळाचा धोका, 3 राज्यांना अलर्ट; महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता एलन शहरातील एका मॉलमध्ये गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. हल्लेखोराने लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. हल्ल्यानंतर तात्काळ पोलिसांनी कारवाई करत त्याला ठार केलं. हल्लेखोरासह 7 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दोघे जण उपचारावेळी मृत्यूमुखी पडले. हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे. गेल्या चार महिन्यात अमेरिकेत जवळपास 200 गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. 30 एप्रिलला टेक्सासमध्येच सार्वजनिक ठिकाणी गोळीबार झाला होता. त्यात आरोपीने 5 जणांवर गोळीबार केला होता. यात एक 9 वर्षांचा मुलगाही होता. त्याआधी 17 एप्रिलला झालेल्या गोळीबारात 6 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.