Home /News /lifestyle /

आता Mask च करणार कोरोनाचा नाश; व्हायरस पृष्ठभागावर येताच रंग बदलणार

आता Mask च करणार कोरोनाचा नाश; व्हायरस पृष्ठभागावर येताच रंग बदलणार

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना सध्या सक्तीनं N-95 मास्क वापरण्याची गरज आहे. जाणून घ्या काय आहेत या N-95 मास्कची विशेष वैशिष्ट्य...

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना सध्या सक्तीनं N-95 मास्क वापरण्याची गरज आहे. जाणून घ्या काय आहेत या N-95 मास्कची विशेष वैशिष्ट्य...

शास्त्रज्ञ असा Antiviral Mask तयार करत आहेत.

    वॉशिंग्टन, 20 मे : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचाव करण्यासाठी मास्क (mask) वापरला जातो. संक्रमित व्यक्तीने मास्क लावल्याने व्हायरस हवेत पसरत नाही, तर अंसक्रमित व्यक्तीने मास्क लावल्याने हवेत पसरलेल्या व्हायरसपासून तो स्वत:चा बचाव करू शकतो. मात्र मास्क वापरतानाही खबरदारी घेणं गरजेचं आहे. योग्य ती काळजी घेतली नाही तर व्हायरसपासून बचाव करणारा मास्कच व्हायरस पसरवण्यास कारणीभूत ठरू शकतो. मात्र आता शास्त्रज्ञ असा अँटिव्हायरल मास्क (antiviral mask) तयार करत आहेत, जो व्हायरसच्या संपर्कात येताच त्याचा नाशही करेल. न्यूजवीकच्या वृत्तानुसार यूएसमधील केनचुकी युनिव्हर्सिटीचे (University of Kentucky ) दिबाकर भट्टाचार्य यांच्या नेतृत्वात हा मास्क तयार केला जातो आहे. जो कोरोनाव्हायरसला पकडून त्याला निष्क्रियही करेल. हे वाचा - Work from Home, आणखी एका समस्येला निमंत्रण; सत्या नडेला यांनी व्यक्त केली चिंता भट्टाचार्य यांच्या मते, "असा मास्क तयार करण्यासाठी सहा महिने लागतील. या मास्कवर प्रोटियोलिटिक एन्झाइम लावलं जाईल जे कोरोनाव्हायरसच्या स्पाइक प्रोटिनशी जोडून त्याला व्हायरसपासून वेगळं करेल आणि व्हायरसचा खात्मा करेल. मास्कवर व्हायरस येताच त्याचा रंग बदलेल" या स्पाइक प्रोटिनमार्फत कोरोनाव्हायरस मानवी शरीरातील पेशींमध्ये प्रवेश करतो आणि शरीरात पसरू लागतो. "या मास्कच्या वापरामुळे व्हायरस संक्रमणाचा धोका खूपच कमी होईल कारण व्हायरस मास्कच्या पृष्ठभागावरच मरेल. एकदा या मास्कचं परीक्षण यशस्वी झाल्यास त्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जाईल", असंही भट्टाचार्य म्हणालेत. सामान्य मास्कपासून काय धोका? सध्या जे मास्क वापरले जात आहेत, त्यामुळे व्हायरस नाक-तोंडातून शरीरात जाण्याची शक्यता कमी असते. मात्र व्हायरस मास्कच्या पृष्ठभागावर असतात. त्यामुळे मास्क वापरताना काळजी घ्यावी लागते. मास्कच्या पुढील भागाला स्पर्श करायचा नसतो. शिवाय तो काढतानाही दोन टोकांना पकडून काढायचा असतो. वापरलेला मास्कची विल्हेवाटही योग्य प्रकारे लावावी लागते. नाहीतर संक्रमण पसरण्याचा धोका असतो. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा - शाकाहारी लोकांना कोरोनाचा कमी धोका; WHO च्या 'त्या' व्हिडिओमागील सत्य काय?
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या