वॉशिंग्टन, 26 मार्च : अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये वादळामुळे मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जिवित हानी झालीय. प्रचंड वेगाने आलेल्या वादळामुळे २६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. वादळाचा तडाखा बसलेल्या भागात मुसळधार पाऊस आणि भल्या मोठ्या गाराही पडल्या आहेत. वादळामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले असून काही ठिकाणी लोक अडकल्याची भीतीत व्यक्त केली जात आहे. पावसामुळे काही भागातली वीजही गेली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी वादळानंतर आपत्कालीन मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. पीडितांना सर्व प्रकारची मदत केली जाईल असं बायडेन म्हणाले आहेत. मिसिसिपी इमर्जन्सी मॅनेजमेंटने शनिवारी ट्विटरवर म्हटलं की, किमान २६ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. चार जण बेपत्त झाले आहेत.
लंडनमधली `ही` इमारत समजली जाते सर्वांत धोकादायक; गुन्हेगारांच्या वास्तव्यामुळे परिसरात आहे दहशत
वादळाचा वेग इतका होता की यामध्ये ज्या गोष्टी उडाल्या त्या ३० हजार फुटांपर्यंत हवेत उंच गेल्या होत्या. मिसिसिपीचे महापौर टेट रिज्व यांनी सांगितले की, वादळाचा तडाखा बसलेल्या भागात बचावकार्य सुरू आहे. सर्वाधिक नुकसान हे मिसिसिपीच्या रोलिंग फॉर्क भागात झालं आङे. अर्ध्याहून अधिक गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, प्रचंड वादळामुळे १.४ मिलियनहून अधिक घरे आणि उद्योगांची वीज गेली होती. वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी सातत्याने काम सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, थंडीच्या महिन्यांमध्ये दक्षिण अमेरिकेत मोठी वादळे येत असतात. कारण मेक्सिकोच्या खाडीतून गरम आणि दमट हवा वर येते. ती हवा थंड हवेला धडकते.
वादळाचा तडाखा बसलेल्या भागात अत्यावश्यक गोष्टींचा पुरवठा केला जात आहे. बेपत्ता लोकांच्या शोधासाठी प्रशासकीय पथके कार्यरत आहेत. या वादळाने २०११ मध्ये आलेल्या वादळाची आठवण जागी झाली. तेव्हा वादळामुळे १६१ जणांचा मृत्यू झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America