मुंबई, 25 मार्च, घर ही एक अशी जागा असते, जिथे माणसाला सर्वांत सुरक्षित वाटतं. घरात प्रवेश करताच माणूस बाहेरचा सर्व थकवा विसरतो; पण हे घर सुरक्षित राहण्याऐवजी जगातल्या सर्वांत धोकादायक ठिकाणांपैकी एक असेल तर? होय, आज आम्ही तुम्हाला अशाच एका अपार्टमेंटबद्दल सांगणार आहोत, जी जगातली सर्वांत धोकादायक इमारत म्हणून ओळखली जाते. यापेक्षा असुरक्षित अपार्टमेंट तुम्ही क्वचितच पाहिली असेल. या इमारतीत केवळ गुन्हेगार राहतात. या गुन्हेगारांची परिसरात मोठी दहशत आहे.
पश्चिम लंडनमधली विलो ट्री लेन ही जगातली सर्वांत धोकादायक इमारत समजली जाते. या ठिकाणाला गुन्हेगारीचा इतिहास आहे. त्यामुळे जगातल्या सर्वांत धोकादायक रिअल इस्टेटमध्ये या इमारतीची गणना होते. या परिसरात राहणारे नागरिकही रात्रीच्या वेळी या ठिकाणाजवळ जाण्यास कचरतात. वास्तविक या वास्तूचा आणि तिथल्या रहिवाशांचा इतिहास ऐकल्यानंतर कोणालाही तिथे राहण्याची भीती वाटेल. या इमारतीला गंभीर गुन्हेगारीचा इतिहास आहे. या इमारतीत फक्त गुन्हेगारच राहत असल्याचं बोललं जातं.
वाचा-उडत्या विमानात पायलट बेशुद्ध, 1 तास जीव मुठीत धरून हवेत लटकले प्रवाशी; शेवटी...
या वर्षी घडले अनेक गुन्हे
`अवर वॉच` नावाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी अवघ्या तीन महिन्यांत या परिसरात सुमारे 463 गुन्हे घडले आहेत. हे सर्व गुन्हे या इमारतीच्या केवळ एक मैल परिघात घडले आहेत. त्यामुळे या इमारतीच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनीही भीती व्यक्त केली आहे. या एका इमारतीमुळे संपूर्ण परिसरात कसं भीतीचं वातावरण आहे, हे परिसरातल्या रहिवाशांनी सांगितलं. सायंकाळनंतर या भागात कोणीही यायला नकार देतं.
मार्केटचं नुकसान
`माय लंडन`शी बोलताना तिथल्या पटेल हर्दिक नावाच्या स्थानिक व्यक्तीने सांगितलं, `मी गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात दुकान चालवत होतो; मात्र आता या भागात व्यवसाय करणं शक्य नाही. या इमारतीत राहणारे गुन्हेगार दुकानात येऊन वस्तू फुकटात घेऊन जातात. कोणीही त्यांना विरोध करत नाही. कोणी त्यांना विरोध करायचा प्रयत्न केला तर प्रसंगी त्याचा जीवही जाऊ शकतो.
67 वर्षांच्या एका महिलेने सांगितलं, `मी आता घराबाहेर पडत नाही. मला खूप भीती वाटते. कोण कधी कुणाची हत्या करील, हे सांगताच येत नाही. त्यामुळे मला माझ्या घरातच सुरक्षित वाटतं.`या इमारतीतल्या रहिवाशांची परिसरात मोठी दहशत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे सर्वसामान्य नाागरिक या गुन्हेगारांचा सामना करू शकत नाहीत. गुन्हेगारांच्या दहशतीमुळे तिथल्या बाजारपेठेचं मोठं नुकसान होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.