Home /News /videsh /

अमेरिकेचं मोठं पाऊल, अफगाणिस्तानची सत्ता मिळूनही तालिबान राहणार कंगाल

अमेरिकेचं मोठं पाऊल, अफगाणिस्तानची सत्ता मिळूनही तालिबान राहणार कंगाल

तालिबाननं (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केला असला तरी देश चालवण्यासाठी आवश्यक असणारा पैसा (Funds) त्यांना मिळणं अमेरिकेनं (America) अवघड केलं आहे.

    न्यूयॉर्क, 18 ऑगस्ट : तालिबाननं (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केला असला तरी देश चालवण्यासाठी आवश्यक असणारा पैसा (Funds) त्यांना मिळणं अमेरिकेनं (America) अवघड केलं आहे. अफगाणिस्तान सरकारचा अमेरिकी बँकेत (American banks) ठेवलेला निधी गोठवण्याचा (freeze) निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे तालिबानसमोर मोठं आर्थिक आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिकेकडे आर्थिक नाड्या गेल्या वीस वर्षांपासून अफगाणिस्तानमध्ये अमेरिका पुरस्कृत सरकार असल्यामुळे अफगाणिस्तानमधील बराचसा सरकारी निधी हा अमेरिकेतील बँकांमध्ये ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये विदेशी चलन, सोनं आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. याची एकूण किंमत किती, याचे तपशील अद्याप उपलब्ध नाहीत. मात्र अफगाणिस्तानची बहुतांश संपत्ती सध्या देशाबाहेरील खात्यांमध्ये असून अमेरिकेतील संपत्ती मिळवणं आता तालिबानला सहजासहजी शक्य होणार नसल्याचं वृत्त ‘द वॉशिंग्टन पोस्ट’नं दिलं आहे. अफगाणी गव्हर्नरही देशाबाहेर अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ गनी यांनी तालिबानच्या आक्रमणानंतर देश सोडण्याचा निर्णय़ घेतला असून त्यापाठोपाठ अफगाणिस्तनच्या मुख्य बँकेचे गव्हर्नर अजमल अहमदी यांनीदेखील पदाचा राजीनामा देत असून देश सोडत असल्याचं ट्विट करून जाहीर केलं आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यापर्यंत अफगाणिस्तानच्या केंद्रीय बँकेकडे 9.4 अब्ज डॉलरची आरक्षित मालमत्ता होती. देशाच्या एकूण उत्पन्नापैकी हा केवळ एक तृतीयांश भाग असून दोन तृतीयांश भाग हा देशाबाहेर असल्याची माहिती आहे. हे वाचा -VIDEO: नागपुरात ज्वेलर्सवर दरोडा; लुटीचा थरार कॅमेऱ्यात कैद, पाहा धक्कादायक CCTV अमेरिकेकडून तोंडावर बोट अफगाणिस्तान सरकारची अमेरिकेतील खाती गोठवण्याचा निर्णय झाला असला, तरी व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्कच्या प्रवक्त्यांनीदेखील याबाबत मौन बाळगणंच पसंत केलं आहे. अफगाणिस्तान सरकारच्या संपत्तीपैकी सर्वात मोठा हिस्सा याच बँकेत असल्याचं मानलं जातं.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Afghanistan, Joe biden, Taliban, United States Of America (Country)

    पुढील बातम्या