नागपूर, 18 ऑगस्ट : नागपुरमधील खापरखेडा (Khaparkheda Nagpur) पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका जेवलर्सवर दरोडा (Robbery at Jwelers) टाकण्यात आला. बंदुकीच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र दरोडेखोर नवखे असल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला. तीन दरोडेखोर हे दुकानाच्या आत शिरताच त्यांनी दुकानाचे शटर बंद केले. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून दुकान लुटायला सुरवात केली. (Caught in CCTV) दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवताच दुकानात बसलेल्या पती आणि पत्नीने प्रसंगावध दाखल स्वतःला बाजूच्या खोलीत बंद करून घेतले. यानंतर ज्वेलर्सच्या मालक दाम्पत्याने जोरजोरात ओरडाओरड करण्यास सुरवात केली. या दम्पत्याच्या जोरजोरात ओरडण्याने घाबरलेले दरोडेखोरांना एक मिनिटांच्या आता दुकानातून काढता पाय घ्यावा लागला.
— News18Lokmat (@News18lokmat) August 18, 2021
संधी असतांना घाबरलेल्या दरोडेखोरांना खाली हात जावे लागले. सध्या पोलीस आता या आरोपींचा शोध घेत आहे. ही संपूर्ण घटना ज्वेलर्समधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्हीत दिसत आहे की तीन दरोडेखोर हे लूट करण्याचा प्रयत्न करत आहेत. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जरीपटका भागात दरोडा काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नारा भीम चौकात एका ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यात आला होता. यावेळी ज्वेलर्स मालकाला बंदुकीचा धाक दाखवत लुटण्यात आले होते. या घटनेचाही सीसीटीव्ही समोर आला होता. या प्रकरणी चारपैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.