शाळा सुरू होताच 'या' देशात कोरोनाचा विस्फोट! 11 विद्यार्थी पॉझिटिव्ह, 268 क्वारंटाइन

शाळा सुरू होताच 'या' देशात कोरोनाचा विस्फोट! 11 विद्यार्थी पॉझिटिव्ह, 268 क्वारंटाइन

अमेरिकेत शाळा सुरू करणे प्रशासनाला महागात पडले आहे. लॉकडाऊनमध्येही ट्रम्प प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला, आणि आता त्यामुळे कोरोनाचा विस्फोट झाल्याचे दिसत आहे.

  • Share this:

अटलांटा, 09 ऑगस्ट: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 2 कोटींच्या घरात जाण्याच्या वाटेवर आहेत. यातच काही देशांनी लॉकडाऊन हटवत शाळा, महाविद्यालये खुली केली आहेत. मात्र अमेरिकेत शाळा सुरू करणे प्रशासनाला महागात पडले आहे. लॉकडाऊनमध्येही ट्रम्प प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला, आणि आता त्यामुळे कोरोनाचा विस्फोट झाल्याचे दिसत आहे. जॉर्जियाची राजधानी असलेल्या अटलांटामध्ये शाळा सुरू झाल्यानंतर 11 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 260 विद्यार्थी आणि 8 शिक्षकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

शाळा प्रशासनाने सांगितले की, कोरोनाच्या संसर्गामुळे 11 विद्यार्थी आणि शालेय कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यानंतर, त्या संक्रमित विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांना आणि कर्मचार्‍यांना दोन आठवड्यांसाठी क्वारंटाईनमध्ये रहाण्यास सांगितले आहे. हे सर्व विद्यार्थी प्राथमिक, माध्यमिक व हायस्कूलचे होते.

वाचा-तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या आकडेवारीनं मोडला रेकॉर्ड, 24 तासातील धक्कादायक आकडेवारी

शाळा सुरू झाल्यानंतर संक्रमणाचे पहिले प्रकरण

ट्रम्प प्रशासनाने शाळा सुरू केल्यानंतर ही प्रकरणं समोर आली. शाळा सुरू झाल्यानंतर एका आठवड्याआधीच विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. 3 ऑगस्ट रोजी शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने आदेश जारी करून शाळांना सूचना दिल्या. दरम्यान, ट्रम्प सरकारने हा नवीन निर्णय साथीच्या काळात पालक आणि शाळा प्रशासनासाठी अस्वस्थ केला.

वाचा-कोरोनाच्या भीतीने आजोबांनी उचललं टोकाचं पाऊल, पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये खळबळ

'मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून घेतला निर्णय'

एका सरकारी अधिकाऱ्याने या निर्णयाचा बचाव करत असे म्हटले आहे की आम्हाला माहित आहे की राष्ट्रीय मीडिया देशभरातील शाळा पुन्हा सुरू करण्याचे निरीक्षण करीत आहे. परंतु आमचा निर्णय न्यूयॉर्कमध्ये लोक काय विचार करतात यावर अवलंबून नाही, किंवा आम्हाला आमच्या प्रतिमेबद्दल भीती वाटत नाही परंतु आपले लक्ष मुलांसाठी अधिक चांगले करण्यावर आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 9, 2020, 10:37 AM IST

ताज्या बातम्या