• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • अमेरिकेत गोळीबारात मारला गेला 5 वर्षांचा चिमुरडा; अंत्यसंस्कारासाठी जमले 5.2 कोटी रुपये

अमेरिकेत गोळीबारात मारला गेला 5 वर्षांचा चिमुरडा; अंत्यसंस्कारासाठी जमले 5.2 कोटी रुपये

काहीच कारण नसताना, काहीच केलेलं नसताना हा चिमुरडा जिवानिशी गेला म्हणून अवघा देश हळहळला आणि क्राउड फंडिंच्या माध्यमातून जमले तब्बल 5.2 कोटी रुपयांएवढी रक्कम.

 • Share this:
  कॅलिफॉर्निया, 17 ऑगस्ट : अमेरिकेत अंदाधुंद गोळीबारात ठार होणाऱ्या निष्पाप नागरिकांची संख्या मोठी आहे. 5 वर्षांचा कॅनन हिन्नाट अशाच एका घटनेत बळी गेला. नॉर्थ कॅरोलिनामध्ये गोळीबारात बळी गेलेल्या या चिमुरड्याने संपूर्ण अमेरिकेचं लक्ष वेधलं. काहीच कारण नसताना, काहीच केलेलं नसताना हा चिमुरडा जिवानिशी गेला म्हणून अवघा देश हळहळला आणि त्याच्या अंत्यसंस्कारासाठी क्राउड फंडिंच्या माध्यमातून जमले तब्बल 5.2 कोटी रुपयांएवढी रक्कम. कॅनन हिन्नाटची आजी ग्वेन हिन्नाटने एका वेबसाईटवर GoFundMe नावाने आवाहन केलं आणि आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला. आमचा परिवार या अतर्क्य हिंसेमुळे अलक्पित संकटातून जात आहे. या कठीण समयी आम्हाला मदत करा, असं आवाहन ग्वेन यांनी केलं. त्यांच्या या पेजवर #justice for Cannon या हॅशटॅगने मदत जमा झाली. अवघ्या काही तासांत अमेरिकेत हा हॅशटॅग पोहोचला आणि मदतीचा ओघ सुरू झाला. गेल्या गुरुवारी कॅनन हिन्नाटवर अंत्यसंस्कार झाले. कॅननच्या शेजारीच राहणाऱ्या 25 वर्षांच्या एका युवकावर ही हत्या केल्याचा आरोप आहे. डॅरिअस नॅथेनियल सॅसम्स असं आरोपीचं नाव आहे. भरधाव बाईकवरून आलेल्या डॅरिअसने अंदाधुंद गोळीबार करत कॅननचा जीव घेतला. हे वाचा -सुशांत प्रकरणात नवी माहिती समोर; मानसोपचारच नाही तर घेत होता आध्यात्मिक उपचारही कॅननच्या हत्येमागे वंशवादाचं कारण असल्याचा प्रचार सोशल मीडियावर काही लोकांनी केला होता. पण कॅननचे वडील ऑस्टिन हिन्नाट यांनीच हा वर्णभेदाचा प्रकार नसल्याचं म्हटलं आहे. कॅनन गोरा आणि गोळिबार करणारा डॅरिअस कृष्णवर्णीय असल्याने सोशल मीडियावर काही पेजेसवर असा प्रसार सुरू होता.
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published: