Home /News /entertainment /

सुशांत प्रकरणात नवी माहिती समोर; मानसोपचारच नाही तर घेत होता आध्यात्मिक उपचारही

सुशांत प्रकरणात नवी माहिती समोर; मानसोपचारच नाही तर घेत होता आध्यात्मिक उपचारही

आपल्या उपचारामुळे सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) 90% बरा झाल्याचं रिया चक्रवर्तीने (Rhea chakraborty) सांगितलं होतं, असं उपचारकर्ते मोहन जोशी यांनी सांगितलं.

    मुंबई, 17 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) नैराश्येत होता त्याने मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचारही करून घेतले होते. ही माहिती याआधी समोर आली मात्र आता आणखी एक माहिती समोर येते आहे ती म्हणजे सुशांतने आध्यात्मिक उपचारही घेतले होते. ठाण्यातील आध्यात्मिक उपचारकर्ते मोहन जोशी (Mohan joshi) यांनी आपण सुशांतवर उपचार केल्याचं सांगितलं आहे. सुशांतवर आपण दोन वेळा उपचार केले. 13 आणि 14 जुलै 2019 रोजी अंधेरीतील वॉटर स्टोन क्लबमध्ये आपण सुशांतवर उपचार केल्याचं मोहन जोशी यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं. त्यावेळी क्लबचं भाडं आणि उपचार पकडून त्याचा दिवसाला जवळपास एक लाख रुपये खर्च आला होता, असंही ते म्हणाले. मोहन जोशी यांनी सांगितलं, "सुशांत सिंह राजपूत नैराश्येत होता. त्यावेळी रिया किंवा सुशांत यांनी चौकशी केली. कदाचित त्यांना माझी माहिती आणि फोन नंबर इंटरनेटवरून मिळाला असावा. रियाने मला फोन केला आणि अंधेरीतील वॉटर स्टोन क्लबमध्ये बोलवलं. तिच्यासह असलेल्या व्यक्तीचं नाव तिनं सुशांत सिंह राजपूत सांगितलं. तो नैराश्येत होता आणि त्याला भूतप्रेत दिसतात, तो ओरडतो, किंचाळतो, रडतो असं रियाने त्याच्याबाबत सांगितलं. मी रियाला धीर दिला आणि माझं काम सुरू केलं" हे वाचा - "सुशांतच्या स्टाफनेच केली त्याची हत्या", माजी मॅनेजरचा खळबळजनक दावा "मी सुशांतच्या डोक्यावर जवळपास पाच ते सात मिनिटं माझा हात ठेवून प्रार्थना केली. तिथं आम्ही 25 मिनिटं होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी रियाचा फोन आला सुशांत आधीसारखा हसतोय बोलयतो, तो 90% बरा झाल्याचं तिनं मला सांगितलं आणि मला दुपारी जेवायला बोलावलं. मी त्यावेळी पुन्हा सुशांतच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली आणि आम्ही जेवायला बसलो. यानंतर मी रियाला विनंती केली मी दोन वेळा उपचारासाठी अंधेरीला आलो आता यापुढे आपल्याला उपचार घ्यायचे असतील तर तुम्हाला ठाण्याला यावं लागेल. मात्र त्यानंतर मला त्यांचा कधीच फोन आला नाही" हे वाचा - सुशांतच्या मृत्यूदिवशी त्याच्या घरी दिसलेली मिस्ट्री गर्ल कोण? समोर आली तिची ओळख मोहन जोशी म्हणाले, सुशांतचा अध्यात्मावर खूप विश्वास होता. त्याच्या आत्महत्येननंतर तो एका मोठ्या अध्यात्म गुरुंचा शिष्यही होता असं समजलं. पण ते हयात नसल्याने सुशांतने मोहन जोशी यांच्याकडे जाण्याचं ठरवलं आणि त्यांच्याकडून उपचार घेतले. सुशांतच्या हातात सतत रुद्राक्षाची माळही असायची, असं समोर येत आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या