Home /News /videsh /

आपल्या या सवयीमुळे मारला गेला अल-कायदाचा म्होरक्या जवाहिरी; 21 वर्षाच्या शोधानंतर अमेरिकेनं असा आखला प्लॅन

आपल्या या सवयीमुळे मारला गेला अल-कायदाचा म्होरक्या जवाहिरी; 21 वर्षाच्या शोधानंतर अमेरिकेनं असा आखला प्लॅन

सीआयएने अल जवाहिरीला ड्रोन हल्ल्यात ठार केलं. अल जवाहिरीचा संबंध 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेच्या ट्विन टॉवर्सवर झालेल्या विमान हल्ल्याशी होता.

    मुंबई 02 ऑगस्ट : दहशतवादाविरुद्धच्या कारवाईत अमेरिकेला मोठं यश मिळालं असून काबूलमध्ये ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी ठार झाला आहे. जवाहिरीच्या मृत्यूनंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी स्वत: व्हाईट हाऊसमधून यशस्वी ऑपरेशनची घोषणा केली आणि सांगितलं की सीआयएने अल जवाहिरीला ड्रोन हल्ल्यात ठार केलं. अल जवाहिरीचा संबंध 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेच्या ट्विन टॉवर्सवर झालेल्या विमान हल्ल्याशी होता. अल कायदाचा प्रमुख अल-जवाहिरी (Ayman al-Zawahiri) एका विशिष्ट सवयीमुळे मारला गेला. अमेरिकी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की जवाहिरीला वारंवार घराच्या बाल्कनीत जाण्याची सवय होती, जी त्याला महागात पडली. बाल्कनीत येण्याच्या सवयीमुळे अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएच्या अधिकाऱ्यांना जवाहिरीच्या काबूलमध्ये असण्याची कल्पना आली आणि त्यांनी रिपर ड्रोनमधून हेलफायर मिसाईल डागून जवाहिरीला ठार केलं. मोठं यश! ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा प्रमुख अयमान जवाहिरी ठार, लादेननंतर सांभाळत होता सूत्रे तालिबानचे गृहमंत्री शिराजुद्दीन हक्कानी यांनी अल-जवाहिरीला आश्रय दिल्याचं सांगितलं जात आहे. या हल्ल्यात हक्कानीचा एक नातेवाईक कमांडरही ठार झाल्याची माहिती आहे. जवाहिरीसोबत त्याच घरात त्याचं कुटुंबही राहत होतं. या ऑपरेशनची खास गोष्ट म्हणजे यासाठी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एकही अमेरिकन सैनिक उपस्थित नव्हता. या हल्ल्यावेळी आमचा एकही सैनिक काबूलमध्ये उपस्थित नव्हता, असं अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं. 31 जुलै रोजी, राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या आदेशानुसार, अमेरिकेने अचूक ड्रोन हल्ला केला आणि अल-जवाहिरीला ठार केलं. काबूलमधील अमेरिकेच्या या कारवाईचा तालिबानने निषेध केला असून हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. हल्ल्याची पुष्टी करताना तालिबानचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी सांगितलं की, 31 जुलैच्या रात्री काबुलच्या शेरपूर भागात हवाई हल्ला झाला आणि तपासात हा हल्ला अमेरिकन ड्रोनने केल्याचं समोर आलं आहे. यासोबतच तालिबानने ड्रोन हल्ला हा आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि दोहा कराराचे उल्लंघन असल्याचं सांगत निषेध केला.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Osama bin laden, Terrorist

    पुढील बातम्या