नवी दिल्ली 02 ऑगस्ट : दहशतवादाविरुद्धच्या युद्धात जगाला आणखी एक यश मिळताना दिसत आहे. अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी मारला गेल्याचं वृत्त आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे 2011 मध्ये ओसामा बिन लादेनच्या खात्मानंतर याकडे मोठं यश म्हणून पाहिलं जात आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सोमवारी जवाहिरीच्या मृत्यूची माहिती दिली. या दहशतवाद्यावर 25 मिलियन डॉलर इनाम होता. 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या हल्ल्यातही त्याचा हात असल्याची नोंद आहे, ज्यात सुमारे 3000 लोकांचा मृत्यू झाला होता.
टेक ऑफआधीच मोठी दुर्घटना; इंडिगोच्या विमानाचं चाक चिखलात फसलं अन्..
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकन अधिकार्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, अमेरिकेनं रविवारी सकाळी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर ड्रोन हल्ला केला. व्हाईट हाऊसमधून दिलेल्या आपल्या भाषणात बायडन म्हणाले, "आता न्याय झाला आहे आणि तो आता हा दहशतवादी नेता राहिलेला नाही."
अमेरिकन गुप्तचर अधिकाऱ्यांना खात्री पटली आहे की ठार झालेला व्यक्ती जवाहिरीच आहे . या हल्ल्यात इतर कोणाचाही मृत्यू झालेला नाही. अलीकडेच जवाहिरीच्या मृत्यूच्या अफवा अनेकदा पसरल्या होत्या. हेदेखील सांगितलं जात होतं की तो बऱ्याच दिवसांपासून आजारी होता. आता त्याच्या मृत्यूनंतर असा प्रश्न उपस्थित होत आहे, की ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर त्याला आश्रय दिला होता का? वृत्तानुसार, अधिकाऱ्याने सांगितलx की, तालिबान अधिकाऱ्यांना शहरात त्याच्या उपस्थितीची माहिती होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.