Home /News /videsh /

कल्पना चावला यांच्यानंतर भारतीय वंशाची सिरीशा बांदला लवकरच करणार अंतराळ सफर

कल्पना चावला यांच्यानंतर भारतीय वंशाची सिरीशा बांदला लवकरच करणार अंतराळ सफर

Sirisha Bandla:अंतराळात प्रवास (Space Travel) करावा, असे प्रत्येकाला वाटते. परंतु, प्रत्येकाला असा करणं शक्य नसतं. मात्र काही व्यक्ती याबाबत नशीबवान ठरतात आणि त्यांना अशी संधी मिळते. सिरीशा बांदला हे त्यापैकीच एक नाव म्हणता येईल.

पुढे वाचा ...
वॉशिंग्टन, 03 जुलै: अंतराळात प्रवास (Space Travel) करावा, असे प्रत्येकाला वाटते. परंतु, प्रत्येकाला असा करणं शक्य नसतं. मात्र काही व्यक्ती याबाबत नशीबवान ठरतात आणि त्यांना अशी संधी मिळते. सिरीशा बांदला (Sirisha Bandla) हे त्यापैकीच एक नाव म्हणता येईल. व्हर्जिन गॅलॅक्टिकचे मालक आणि प्रसिध्द उद्योगपती रिचर्ड ब्रेनसन (Richard Branson) 11 जुलैला अंतराळ सफरीसाठी रवाना होत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय वंशाची (Indian Origin) सिरीशा बांदला देखील अंतराळात जाणार आहे. सिरीशा बांदला व्हर्जिन गॅलॅक्टिक कंपनीमध्ये सरकारी कामकाज आणि संशोधन कार्याशी संबंधित अधिकारी आहेत. रिचर्ड यांच्यासोबत अन्य 5 जण अंतराळ प्रवासासाठी जात आहेत. भारतात जन्मलेली सिरीशा ही धोकादायक अशा अंतराळ प्रवासाला जाणारी दुसरी महिला आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर (Guntur) हे सिरीशाचे मूळ गाव. यापूर्वी दिवंगत अंतराळ शास्त्रज्ञ कल्पना चावला (Kalpana Chawla) अंतराळात गेल्या होत्या, परंतू दुर्देवाने स्पेस शटल कोलंबियाच्या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. सिरीशा बांदलाने 2015 मध्ये व्हर्जिन कंपनी जॉईन केली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. हेही वाचा- तापमान वाढीमुळे जाणार अनेकांचे बळी; 2041 साली या शहरातील तापमान होईल 50 अंश सिरीशा बांदला व्हर्जिन ऑर्बिटचे वॉशिंग्टन येथील कामकाज पाहते. या कंपनीने नुकतेच बोईंग 747 विमानाच्या मदतीने एक उपग्रह (Satellite) अंतराळात पाठवला होता. सिरीशाने जॉर्ज टाऊन युनिव्हर्सिटीतून एमबीए केले आहे. कल्पना चावला यांच्यानंतर सिरीशा ही अंतराळात जाणारी दुसरी भारतीय महिला ठरणार आहे. भारताकडून राकेश शर्मा सर्वप्रथम अंतराळात गेले होते. त्यांच्यानंतर कल्पना चावला अंतराळात गेल्या होत्या. तसेच भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्स यांनी देखील अंतराळावर पाऊल ठेवले होते. अमेरिकेतील अंतराळयान कंपनी व्हर्जिन गॅलॅक्टिकच्या रिचर्ड ब्रेनसन यांनी आपले सहकारी अब्जाधीश जेफ बेझोस (Jeff Bezos) यांच्या 9 दिवस आधी अंतराळ यात्रेचे नियोजन केले आहे. हेही वाचा-  अतिवृष्टीचा कहर! भूस्खलनामुळे घरं उद्धवस्त; 19 जण बेपत्ता, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO ब्रेनसन यांच्या कंपनीने गुरुवारी संध्याकाळी जाहिर केले की 11 जुलै रोजी त्यांचे पुढील अंतराळ उड्डाण होईल आणि या सफरीमध्ये संस्थापकांसह अन्य 6 जण सहभागी होतील. हे अंतराळ यान न्यू मेक्सिको (New Mexico) येथून उड्डाण करेल. या यानाचे सर्व क्रू सदस्य कंपनीचे कर्मचारी असतील. व्हर्जिन गॅलॅक्टिकचे अंतराळात हे चौथे उड्डाण असेल. ही बातमी जाहिर होण्यापूर्वी काही तास अगोदर बेझोस यांची कंपनी ब्लू ओरिजीनने सांगितले की बेझोस 20 जुलैला अंतराळ सफरीला निघतील. यावेळी त्यांच्या समावेत एरोस्पेस क्षेत्रातील एक अग्रणी महिला असेल. ही महिला अंतराळात जाण्यासाठी 60 वर्षांपासून प्रतीक्षा करीत आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: International, Space, Spacecraft

पुढील बातम्या