Home /News /videsh /

मित्र असलेल्या पाकिस्ताननेही दिला चीनला धक्का, भारताप्रमाणेच Tik Tokवर घातली बंदी

मित्र असलेल्या पाकिस्ताननेही दिला चीनला धक्का, भारताप्रमाणेच Tik Tokवर घातली बंदी

या आधी भारत आणि अमेरिकेनेही सुरक्षेच्या कारणांवरून Tik Tokवर बंदी घातली होती. पाकिस्तानने मात्र सुरक्षेचं नाही तर संस्कृतीचं कारण देत बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

    इस्लामाबाद 09 ऑक्टोबर: मित्र देश असलेल्या पाकिस्ताननेही चीनला धक्का दिला आहे. संस्कृती आणि अश्लिलतेचं कारण देत चिनी App असलेल्या Tik Tokवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकदा सांगूनही Tik Tok नियमांचं उल्लंघन करत आहे. ज्या सूचना केल्या होत्या त्याचं पालन केलं जात नाही असं पाकिस्तानच्या दूरसंचार विभागाने म्हटलं आहे. Tik Tokवर अश्लिल आणि तर गोष्टींचं प्रमाण वाढलं आहे. त्याविरुद्ध कारवाई करावी असं वारंवार सांगण्यात आलं होत मात्र त्याकडे दुलर्क्ष झाल्याने ही बंदी घालण्यात आल्याचं म्हटलं जातं. या आधी भारत आणि अमेरिकेनेही सुरक्षेच्या कारणांवरून Tik Tokवर बंदी घातली होती. पाकिस्तानने मात्र सुरक्षेचं नाही तर संस्कृतीचं कारण देत बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यात Tik Tokने सुधारणा केली तर या निर्णयाचा फेरविचार होऊ शकतो असंही पाकिस्तानने म्हटलं आहे. पाकिस्तानमध्येही Tik Tok वापरण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. मात्र त्याचा गैरवापर होत असल्याने पंतप्रधान इम्रान खान हे सुद्धा Tik Tokवर बंदी घालण्याच्या मताचे होते असं पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री शिबली फराज यांनी म्हटलं आहे. मोदींनी उल्लेखलेलं हवेतून पाणी तयार करणारं यंत्र खरंच आहे का? जाणून घ्या सत्य भारतात माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. चीनकडून सायबर अटॅकची भीती गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होती. त्यावर उपाय म्हणून या चिनी अॅप्सवर बंधनं नव्हे तर बंदीच घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कंपन्या या Appsच्या माध्यमातून कोट्यवधी फोन धारकांची माहिती चीनला पाठवित होत्या असं आढळून आलं आहे. अमेरिकेची सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकला चीनची व्हिडियो शेयरिंग App कंपनी बाइटडांसला विकत घेणार आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या कराराला मंजूरी दिली आहे. वॉलमार्टही या कराराचा एक भाग असेल अशी माहितीही ट्रम्प यांनी दिली. टेक्सासमध्ये या कंपनीचं ऑफिस असणार असून टिकटॉक (Tik Tok)ची मालकी त्यामुळे अमेरिकेकडे येणार आहे. हे प्रकरण अमेरिकन कोर्टातही गेलं होत. अमेरिका आणि चीनमध्ये संबंध बिघडल्यानंतर दोन्ही देशांमध्ये व्यापार युद्धाला सुरूवात झाली होती. अमेरिका चिनी मालांवर सूट देते मात्र चीन अमेरिकन कंपन्यांना सवलती देत नाही असा अमेरिकेचा आरोप आहे. 'घराघरांत विवेकानंदांची प्रतिमा लावा, तर पुढील 35 वर्षे राहिल भाजप सरकार' चीनने WeChat आणि Tik Tok वर बंदी घालण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. या कंपन्यांची मालकी अमेरिकन कंपन्याकडे आली नाही तर त्यावर बंदी घातली जाईल असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. या Appsमुळे अमेरिकेच्या सुरक्षेला धोका असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Tik tok

    पुढील बातम्या